निप्पॉन लाईफमधील प्रवेशामुळे रिलायन्स म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना होणार लाभ

निप्पॉन लाईफमधील प्रवेशामुळे रिलायन्स म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना होणार लाभ

निप्पॉन लाईफ इन्शुरन्स गेल्या 7 वर्षांपासून RNAM चा धोरणात्मक भागीदार आहे.

 • Share this:

मुंबई, 31 मे- जपानच्या निप्पॉन लाईफ इन्शुरन्स कंपनीने अलीकडेच रिलायन्स कॅपिटलसोबत भागीदारी करून रिलायन्स निप्पॉन असेट मॅनेमजेंट लिमिटेड (RNAM) ह्या रिलायन्स कॅपिटल म्युच्युअल फंड बिजनेसमधील आपला वाटा 75% इतका वाढवला आहे व कंपनीतील रिलायन्स कॅपिटलमधील सध्याहे शेअरहोल्डिंग विकत घेतले आहे.

RNAM सध्या निप्पॉन लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि रिलायन्स कॅपिटलचे जॉईंट व्हेंचर आहे व कंपनीमध्ये प्रत्येक भागीदारांच्या मालकीचे 42.88% इक्विटी शेअर्स आहेत. एकदा ही एम अँड ए डील अस्तित्वात आली, तर RNAM ह्या जपानी कंपनीची एक शाखा असेल आणि रिलायन्स कॅपिटल म्युच्युअल फंड बिजनेसमधून बाहेर पडेल. भारतातील आर्थिक सेवांमधील थेट विदेशी‌ गुंतवणूकीपैकी (एफडीआय) ही एक डील असेल.

निप्पॉन लाईफ इन्शुरन्स गेल्या 7 वर्षांपासून RNAM चा धोरणात्मक भागीदार आहे. निप्पॉन लाईफने 2012 मध्ये $290 दशलक्ष ह्या आपल्या पहिल्या गुंतवणुकीला सुरुवात केली व RNAM मध्ये 26% पर्यंत वाटा प्राप्त केला. 2014 व 2015 मधील पुढील गुंतवणूक ट्रेंचेसद्वारे निप्पॉन लाईफ इन्शुरन्सने RNAM मधील आपला समभाग वाढवला व तो आत्ता आहे त्या पातळीला पोहचला. RNAM ने ऑक्टोबर 2017 मध्ये सुरुवातीची पब्लिक ऑफरिंग (IPO) आणली. असेट मॅनेजमेंट उद्योगामधील ही‌पहिली आयपीओ अतिशय सफल ठरली (80 पेक्षा जास्त वेळेस सब्स्क्रायबिंग केले गेले).

निप्पॉन लाईफ इन्शुरन्स काय आहे?

 • निप्पॉन लाईफ ही विमा आणि असेट मॅनेजमेंटमध्ये रस असलेली जागतिक पातळीवरील आर्थिक कंपनी आहे. 
 • फॉर्च्युन 500 कंपनी असलेली निप्पॉन लाईफ आंतरराष्ट्रीय पातळीवर 49 लाख कोटींपेक्षा जास्त निधीचे (भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्याप्तीहुन दुप्पट) व्यवस्थापन करते व तिला रिलायन्स एडीएजीपेक्षा अधिक संपन्न मानले जाते.
 • निप्पॉन लाईफ इन्शुरन्स ही 130 वर्षे जुनी कंपनी आहे व ती जपानमधील सर्वांत मोठ्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक आहे व ती अमेरिकन $ 700 अब्ज पेक्षा अधिक असेटसचे व्यवस्थापन करते. निप्पॉन लाईफ इन्शुरन्सचे महसूल अमेरिकन $ 70 अब्ज पेक्षा जास्त आहे आणि तिचा मुख्य संचालन नफा अमेरिकन $ 6.8 अब्ज आहे.
 • निप्पॉन लाईफ इन्शुरन्सचा जपानमध्ये खाजगी विमा कंपन्यांमधील सर्वांत मोठा वाटा मार्केटमध्ये आहे आणि इथे 70,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात आणि जगभरात सुमारे 1.4 कोटी लोकांना सेवा दिली जाते. निप्पॉन लाईफ इन्शुरन्सद्वारे व्यवस्थापन केले जाणा-या असेटसची एकूण व्याप्ती भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्याप्तीच्या दुप्पट आहे.
 • आता म्युच्युअल फंड बिजनेस रिलायन्स ग्रूपद्वारे विकला जात असल्यामुळे रिलायन्स म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल?
 • आता तर रिलायन्स एमएफ योजनांमध्ये गुंतवणूक करणे तुलनेने अधिक चांगले असेल, कारण फंड मॅनेजर्स, योजनेची उद्दिष्टे व बिजनेस संरचनेमध्ये बदल होणार नाही.
 • म्युच्युअल फंडसचे नियमन सेबी एमएफ नियमन 1996 द्वारे केले जाते. त्यामध्ये एक थ्री- टायर संरचना असते ज्यामध्ये प्रायोजक (ज्यांना एएमसीचे प्रमोटर्स मानले जाते), विश्वस्त आणि एएमसी असतात.
 • प्रायोजकांनी पात्रत निकषांची पूर्तता केली पाहिजे जसे कमीत कमी 5 वर्षांपासून आर्थिक सेवा बिजनेस्मध्ये असणे व किमान 3 वर्षंपासून नफा कमवत असणे व सर्व 5 ही वर्षांमध्ये सकारात्मक निव्वळ प्रगती असली पाहिजे. त्यांनी एएमसीच्या नेट वर्थमध्ये किमान 40% इतके योगदान दिले असले पाहिजे. प्रमाणिकता/ शासनाच्या संदर्भात प्रायोजकांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असला पाहिजे.
 • विश्वस्त म्युच्युअल फंड युनिट धारकांच्या हितांचे संरक्षण फिड्युशियरी क्षमतेने करतात आणि एएमसी सेबी‌ नियमनांची पूर्तता करेल, ह्याची खात्री‌ घेतात. विशेष म्हणजे प्रायोजकांनी स्थापन केलेला एक वेगळा ट्रस्ट आहे (ज्यामध्ये किमान दोन तृतीयांश स्वतंत्र संचालक असावेत) व त्याद्वारे गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या गुंतवणुकीतून प्राप्त केलेले असेटस धारण केले जातात. ते दर सहा महिन्यांनी सेबीला रिपोर्ट करतात व एएमसी कार्याविषयी सांगतात व गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांच्या संदर्भात ते नियामकांना उत्तरदायी असतात.एएमसी विश्वस्ताचे गुंतवणूक व्यवस्थापक आहेत. 
 • त्यांची कामे करताना ह्या तिघांना स्वातंत्र्य असले पाहिजे व ह्या बाबीला कधी कधी आर्म्स- लेंथ नाते असे म्हणतात.एक उदाहरण म्हणून, आयसीआयसीआय बँक आणि प्रुडन्शिअल पीआयसी हे आयसीआयसीआय प्रुडन्शियल एमएफ योजनांचे प्रायोजक आहेत.हे लक्षात घेता ही फक्त अशी बाब अहे ज्यामध्ये एक एएमसीच्या एमएफ योजनांच्या असेटसला दुस-या एएमसीने किंवा दुस-या एएमसीच्या ट्रस्टने प्राप्त केले आहे; त्याचा अर्थ असा होतो की, त्याचे गुंतवणूक व्यवस्थापक बदलले आहेत (उदाहरणार्थ, झ्युरिह एमएफ योजनांच्या असेटसना एचडीएफसी एमएफद्वारे प्राप्त केले गेले आहे) आणि त्यासंदर्भात गुंतवणूकदारांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही आहे.
 • रिलायन्स म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणूकदारांना ह्या मालकीतील बदलामुळे काय लाभ मिळेल?
 • निप्पॉन लाईफ इन्शुरन्स कं. ही एक फॉर्च्यून 500 ग्रूपमधील कंपनी असून ती गेल्या 130 वर्षांपासून सफल होत आलेली आहे. त्याद्वारे कॉरपोरेट गवर्नन्स पद्धती व जोखीम व क्रेडीट व्यवस्थापन प्रक्रिया ह्यांनाही बळकटी मिळेल.
 • त्याद्वारे सबळ मार्केट नॉलेज आणि अतिशय उच्च दर्जाचे संशोधन ज्यासाठी आरएमएफ ओळखले जाते, ते परफॉर्मन्सला मिळेल व त्यामुळे त्यातील सातत्य व शाश्वतता वाढेल.
 • जपानमधील निप्पॉन लाईफचे नेतृत्व, जगातील त्यांचे संबंध आणि सर्वोत्तम पद्धती ह्यामुळे वाढलेल्या एयुएमपासूनही त्यांना लाभ मिळेल. तसेच, त्यातून भारतामध्ये येणा-या कॅपिटल फ्लोलाही मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी मदत मिळेल.

  रिलायन्स म्युच्युअल फंडच्या भागधारकांवर ह्याचा काय परिणाम होईल?

 • एक प्रमोटर म्हणून निप्पॉन लाईफ एक उच्च स्तरावरील खात्रीशीर व्यवस्था आणि आर्थिक क्षमता उपलब्ध करून देते
 • जवळपास 48 देशांमधील असेट व्यवस्थापनाची कार्ये व विम्याशी संबंधित क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर असलेल्या उपस्थितीमुळे निप्पॉन लाईफमध्ये जगभरातील गुंतवणूकदार आकर्षित होतील व ते भारतात गुंतवणूक करतील आणि त्याद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील आरएमएफच्या असेट व्यवस्थापनालाही बळकटी मिळेल.

  निष्कर्ष

  News18मध्ये आम्हांला असे वाटते की, निप्पॉन लाईफ इन्शुरन्स आणि रिलायन्स कॅपिटलमधील RNAM डीलचा लाभ सर्व भागधारकांना म्हणजेच भागधारकांना, म्युच्युअल फंड उद्योगाला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांना (गुंतवणूकदारांना) होईल. संदीप सिक्का ह्यांच्या नेतृत्वातील RNAM च्या सध्याच्या व्यवस्थापन टीमविषयी निप्पॉन लाईफ इन्शुरन्सने आत्मविश्वास व्यक्त केला आहे व भविष्यातही त्यांनीच बिजनेसचे नेतृत्व करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. मॅनेजमेंट सातत्याच्या दृष्टीने कोणतीच अस्थिरता अपेक्षित नाही. गुंतवणूकदारांसाठी हे नेहमीसारखेच असायला हवे.

  संदीप सिक्का, सीईओ आणि कार्यकारी संचालक ह्यांनी म्हंटले की, “RNAM ला जोखीम व्यवस्थापनामधील निप्पॉन लाईफच्या आघाडीवरील पद्धतींमुळे लाभ मिळणे सुरू‌राहील आणि त्याच्या जागतिक नेटवर्कमुळे भारतामध्ये गुंतवणूका येण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.” रिलायन्स म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराच्या बाजूने बघितले तर आपल्या गुंतवणुकांवर काहीच परिणाम होणार नाही. जर आपल्याला काही प्रश्न असेल, तर आपण आपले आर्थिक सल्लागार किंवा आपल्या शहरातील रिलायन्स म्युच्युअल फंड शाखेशी संपर्क करावा.

  VIDEO : ईश्वराची शपथ न घेता रामदास आठवलेंनी अशी घेतली शपथ

 • First published: May 31, 2019, 1:53 PM IST
  Tags:

  ताज्या बातम्या

  corona virus btn
  corona virus btn
  Loading