मुंबई, 03 जून : शेअर बाजार सतत वधारतोयच. सोमवारी ( 3 जून 2019 ) बाजार प्रचंड वधारून बंद झालाय. सेन्सेक्स पहिल्यांदा 40 हजाराच्या पुढे आणि निफ्टी पहिल्यांदा 12 हजाराच्या पुढे जाऊन बंद झालाय. मिडकॅपही हिरव्या निशाणीसोबत 18,132च्या पुढे जाऊन बंद झालाय. बँक निफ्टीतही वाढ झाली. दिवसाअखेर बीएसईचा 30 शेअर्सचा मुख्य इंडेक्स सेन्सेक्स 553.42 अंकांवर म्हणजे 1.4 टक्क्यांची वाढ होऊन 40, 267.62 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा मुख्य इंडेक्स निफ्टी 165.75 अंकांवर म्हणजे 1.39 टक्क्यांनी वधारून 1,088.55वर बंद झाला.
बाजारातल्या तेजीचं कारण
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाची आशा
GDP चे कमकुवत आकडे, आॅटो सेल्सचा धीमेपणा आणि दुसऱ्या आकड्यांनुळे RBIची माॅनेटरी पाॅलिसी कमिटी (MPC) पाॅलिसी दरात 25 बेसिस अंकात कपात करू शकतात. 100 बेसिस अंक 1 टक्क्यांच्या बरोबर आहे. बँकेकडे रोखीची कमतरता आहे. एक चांगली गोष्ट अशी की सरकार येणाऱ्या दिवसांमध्ये खर्च वाढवू शकते.
'या' कारणामुळे भारतातल्या अनेक नोकऱ्यांवर टांगती तलवार
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, तूरडाळ झाली 100 रुपये किलो
इराणबद्दल ट्रम्पचा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठल्याही अटीशिवाय इराण सरकारसोबत न्यूक्लियर प्रोग्रॅमबद्दल बोलायची तयारी दर्शवलीय. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यात. यामुळे आॅइल आणि गॅस शेअर्समध्ये तेजी आली. IOC आणि BPCL यांनी नवा विक्रम केला.
झंडा उँचा रहे हमारा... संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची सियाचीनला भेट
हे शेअर्स वधारले
एचडीएफसी, एचपीसीएल, अदानी गॅस आणि आयजीएल यांनी नवा विक्रम केला. डॉबर, एसयूएल आणि ब्रिटेनियां या शेअर्सची चांगली खरेदी झाली.
SPECIAL REPORT : पाणी काढताना 6 महिला पडल्या विहिरीत, तब्बल 1 तास मृत्यूशी झुंज!