Home /News /money /

पुढील वर्षात या कर्मचाऱ्यांना पगारवाढीची शक्यता, पाहा किती मिळणार वाढ

पुढील वर्षात या कर्मचाऱ्यांना पगारवाढीची शक्यता, पाहा किती मिळणार वाढ

ब्लूमबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये पुढील आर्थिक वर्षात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करतील असा दावा केला आहे.

    नवी दिल्ली, 25 जुलै: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेक कर्मचाऱ्यांना पगारवाढ (Salary Increment) मिळाली नाही. तर अनेकांच्या पगारात कपात करण्यात आली. अशात भारतीय कर्मचाऱ्यांसाठी आता चांगली बातमी आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना पुढील आर्थिक वर्षात चांगली पगारवाढ मिळण्याची आशा आहे. कोरोनाचा अनेक कंपन्यांवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे पगारवाढीची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी निराशा झाली. प्रमोशन, पगारवाढ रोखण्यात आली होती. परंतु आता ब्लूमबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये पुढील आर्थिक वर्षात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करतील असा दावा केला आहे. पुढील वर्षात चांगल्या पगारवाढीची आशा असलेल्या सेक्टर्समध्ये ई-कॉमर्स (E-Commerce), आयटी (IT), फार्मास्युटिकल (Pharmaceutical) आणि आर्थिक सेवा सामिल आहेत. तर दुसरीकडे एयरोस्पेस, हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर्समध्ये चांगली स्थिती निर्माण होण्यास काही काळ लागू शकतो. Gold Hallmarking:जून 2022 पर्यंत सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग आवश्यक नाही? दरम्यान, या वर्षात आयटी सेक्टर्समधील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. अ‍ॅक्सेंचर, टीसीएस, टेक महिंद्रा, इंफोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले आहेत. Fraud Alert! या 4 चुका अजिबात करू नका, Online Banking बाबत महत्त्वपूर्ण माहिती भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोनाच्या या लाटेवर मात करण्यास भारत सक्षम असल्यास, सर्वकाही योग्य असल्यास कर्मचाऱ्यांना एप्रिल 2022 मध्ये पगारात 8 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारीचा मोठा सामना करावा लागला, पगार कपात करण्यात आल्याने ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार प्रायव्हेट सेक्टरसाठी (Private Sector Job) ही बाब दिलासादायक आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Job alert, Money, Salary

    पुढील बातम्या