मराठी बातम्या /बातम्या /मनी /

State Bank Home Auction : स्वस्त किमतीत घराची खरेदी; 5 मार्चपासून लिलावाची प्रक्रिया सुरू

State Bank Home Auction : स्वस्त किमतीत घराची खरेदी; 5 मार्चपासून लिलावाची प्रक्रिया सुरू

sbi

sbi

State Bank Home Auction- तुम्हाला स्वस्त किमतीत घर घ्यायचं असेल तर एक सुवर्णसंधी सध्या उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक असेलली भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) कर्ज फेड (Loan Repay)करू न शकलेल्या कर्जदारांच्या (Defaulters) स्थावर मालमत्तांचा (Properties) लिलाव (Auction) करत आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 1 मार्च: तुम्हाला स्वस्त किमतीत घर घ्यायचं असेल तर एक सुवर्णसंधी सध्या उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक असेलली भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) कर्ज फेड (Loan Repay) करू न शकलेल्या कर्जदारांच्या (Defaulters) स्थावर मालमत्तांचा (Properties) लिलाव (Auction) करत आहे. यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील 1000 पेक्षा जास्त मालमत्ता उपलब्ध असून, त्यावर बोली लावून तुम्ही स्वस्त किंमतीत घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करू शकता.

डीफॉल्ट मालमत्तेचा लिलाव होतो...

ज्या मालमत्तेवरील कर्जाची परतफेड मुदतीत केली जात नाही, अशा मालमत्ता कर्ज देणारी बँक ताब्यात घेते आणि नंतर त्यांचा लिलाव करून आपले कर्ज परत घेते. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया याच पद्धतीनं अशाच मालमत्तांचा लिलाव करत आहे. लिलावात उपलब्ध असलेल्या मालमत्तांबाबत अधिक माहिती https://www.bankeauctions.com/Sbi किंवा https://ibapi.in/ या वेबसाइटसवर उपलब्ध आहे. या मालमत्ता देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत. त्यांच्या ठिकाणांवरून तुम्ही त्यासाठी बोली लावू शकता. या वेबसाइटसवर या मालमत्तांसाठी निश्चित करण्यात आलेली आरक्षित रक्कमही नोंदवण्यात आली आहे. 5 मार्च पासून लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे.

(हे पहा: LPG Gas Cylinder: सामान्यांना फटका, 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर )

या क्रमांकावरही संपर्कही करू शकता ...

 संपर्कासाठी बँकेनं हेल्पलाईन क्रमांक दिले असून, त्यावर फोन करूनही माहिती मिळवू शकता.  033-40602403/40067351/40628253/40645316/40645207/40609118 असे क्रमांक आहेत.

बँकेच्या वतीनं अशा मालमत्ता लीजवरील आहेत की मुक्त आहेत, त्यांचे क्षेत्रफळ, आदी सर्व माहिती सार्वजनिक नोटीसीत दिली जाते. ई-लिलावाची सुविधाही उपलब्ध असून, ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे, ते बँकेत जाऊन या संबंधीची सर्व प्रक्रिया आणि मालमत्तेच्या बाबतीतली सर्व माहिती घेऊ शकतात.

First published:

Tags: SBI, SBI bank