'या' म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं आहे धोकादायक,अशी घ्यावी काळजी

'या' म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं आहे धोकादायक,अशी घ्यावी काळजी

म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बुडतातही. अशा वेळी गुंतवणूकदारांनी काय करावं, याबद्दल पाहू तज्ज्ञ काय सांगतायत?

  • Share this:

मुंबई, 11 मे : म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यासाठी तज्ज्ञ सल्ला देतात. भविष्यकालीन गुंतवणुकीसाठी ते चांगलंही आहे. पण हल्ली डेट फंड्सच्या बाबतीत अनेक नकारात्मक गोष्टी कानावर यायला लागल्यात. तज्ज्ञांचं म्हणणं असंय की IL आणि FS मुळे डेट फंड्सवर संकट यायला लागलंय. अशा वेळी गुंतवणूकदारांनी काय करावं, याबद्दल पाहू तज्ज्ञ काय सांगतायत?

जर तुम्ही चिंतेत असाल तर डेट म्युच्युअल फंड विकू शकता. पण जोपर्यंत मॅच्युरिटीची वेळ येत नाही, तोपर्यंत तुम्हाला वाट पाहण्यावाचून काही पर्याय नाही.

30 वर्षीय गर्भवती आणि बाळाचा मृत्यू, चुकीचे उपचार केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

सेबीच्या वर्गीकरणानंतर गुंतवणूकदारांसाठी स्किमशी संबंधित असलेले धोके ओळखणं सोपं झालंय. गुंतवणूकदारांनी आपल्या स्किमसंबंधी असलेले धोके पाहणंही गरजेचं आहे.

डेट फंड्स म्हणजे काय? - डेट फंडसारखे म्युच्युअल फंड आहेत, जे गुंतवणूकदारांचे पैसे डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये  लावतात. इंस्ट्रुमेंट्स म्हणजे काॅल मनी, बाॅण्ड, डिबेंचर्स, सरकारी सिक्युरिटीज, डिपाॅझिट सर्टिफिकेट आणि कमर्शियल पेपर. वेगवेगळ्या आर्थिक लक्ष्याप्रमाणे डेट फंड असतात.

निवडणूक होईपर्यंत राजकीय विषयावर बोलू नका, राहुल गांधींचा पित्रोदांना दम!

डेट फंड किती प्रकारचे असतात? - डेट फंड अनेक प्रकारचे असतात.लिक्विड फंड, अल्ट्रा शाॅर्ट टर्म फंड, शाॅर्ट टर्म फंड, गिल्ट फंड, इन्कम फंड, क्रेडिट आॅप्युर्चनिटी फंड, मंथली इन्कम प्लॅन आणि फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन.

लिक्विड फंड्स कशाला म्हणतात? - कमी काळासाठी गुंतवणूक करणारे फंड लिक्विड मानले जातात. लिक्विड फंडाला मनी मार्केट फंडही म्हटलं जातं. लिक्विड फंडात काही दिवसांपासून काही आठवडे गुंतवणूक करणं शक्य असतं. जास्त पैसे मिळाले तर या फंडात टाकले जातात. या फंडांना एक्झिट लोड लागत नाही.

लिक्विड फंडातून रक्कम त्वरित बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते. या फंडात तुम्ही थोड्या दिवसांकरता गुंतवणूक करू शकता. यातली गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

'मोदींना हटवून दाखवा...अडवाणींनी वाजपेयींना दिली होती धमकी'

अल्ट्रा शाॅर्ट टर्म फंड्स कशाला म्हणतात? - अल्ट्रा शाॅर्ट फंडात काही आठवड्यांपासून तीन महिन्यांपर्यंत गुंतवणूक शक्य असते. लिक्विड फंडाच्या तुलनेत अल्ट्रा शाॅर्ट टर्म फंडात धोका जास्त असतो. पण दुसऱ्या लाँग टर्म फंडाच्या तुलनेत इथे धोका कमी असतो आणि एफडीपेक्षा जास्त रिटर्न मिळतात.

ज्यांना आपले पैसे थोड्या काळाकरता गुंतवायचे असतील, तर हा फंड चांगला आहे. हे फंड आपला पोर्टफोलिओ काही काळाकरता डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये ठेवतात. हे फंड सरकारी सिक्युरिटीज, डिपाॅझिट सर्टिफिकेट्स, कंपनीज आणि दुसऱ्या आर्थिक संस्था इथे डिपाॅझिट करतात.

शाॅर्ट टर्म फंड काय असतात? - शाॅर्ट टर्म फंड थोडे जास्त काळाच्या गुंतवणुकीसाठी असतो. शाॅर्ट टर्म फंडात 3 महिने ते 1 वर्षापर्यंत गुंतवणूक होते.

राहुल गांधींनी चक्क हेलिकॉप्टर दुरुस्त करायला केली मदत, VIDEO व्हायरल

First published: May 11, 2019, 12:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading