मुंबई : एखादी सिस्टिम बंद किंवा चालू करणं ही जरी साधी गोष्ट वाटत असेल तरी ती फार सोपी नसते. त्यामुळे कधीकधी खूप मोठा फटका बसू शकतो. असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चालू आणि बंद यातील एक चुकीमुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक ऑर्डर रद्द कराव्या लागला. एवढंच नाही तर शेअर मार्केटला मोठा फटका देखील बसला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचे बॅकअप डेटा सेंटर वॉल स्ट्रीटपासून 1127 किमीपेक्षा जास्त अंतरावर शिकागोच्या सेरमार्क रोडवर आहे. बाजार बंद झालं की तो बंद होतो. मात्र, मंगळवारी रात्री न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचाऱ्यांकडून एक छोटी चूक झाली.
ते बाजार बंद झाल्यानंतर नीट बंद करून ऑफिसबाहेर गेले नाहीत. या चुकीमुळे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजार उघडला असता बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले.
गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घ्या
कुठे घडली घटना
न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजची बॅकअप सिस्टीम रात्रभर सुरू असताना म्हणजे ती बंद न झाल्याने अमेरिकन बाजारातही असेच काहीसे घडले. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता मार्केट ट्रेडिंग सुरू झाले तेव्हा सिस्टीमने बाजार उघडण्याऐवजी तो चालू असल्याचं दाखवलं.
यामुळे सुरुवातीची किंमत ठरवणारे दिवसाचे ओपनिंग पर्याय यंत्रणेने बंद केले. या प्रकरणात किती नुकसान झाले, याचा हिशेब आता एक्सचेंज कडून केला जात आहे.
यामुळे वेल्स फार्गो, मॅकडोनाल्ड्स, वॉलमार्ट आणि मॉर्गन स्टॅनली सह 250 हून अधिक कंपन्यांना मोठा फटका बसला. काही ठिकाणी शेअरच्या किमतीत काही मिनिटांतच २५ टक्क्यांपर्यंत चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. यामुळे इतर देशांच्या शेअर मार्केटवरही मोठा परिणाम झाला आहे.
10 हजाराचा एक सिलिंडर....पगारही रखडले; पाकिस्तानचीही होणार 'श्रीलंका'
कर्मचाऱ्यांची एक चूक महागात पडली आहे. सिस्टमने व्यापार उघडण्याऐवजी 09:30 ला सतत ट्रेडिंग म्हणून घेतले आणि किंमती इंट्रा-डे म्हणून किंमती पुढे जात राहिल्या. यामुळे एक्सचेंजला हजारो ट्रेड रद्द करावे लागले, नेमकं किती कोटींचं नुकसान झालं याबाबत सध्या चौकशी सुरू आहे. एक्सचेंजने याला मॅन्युअल एरर असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Share market