पुढच्या वर्षी या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मिळणार सर्वात जास्त नोकऱ्या

पुढच्या वर्षी या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मिळणार सर्वात जास्त नोकऱ्या

नवं वर्ष नोकऱ्यांच्या क्षेत्रात मोठे बदल घेऊन येऊ शकतं. 2020 या वर्षात कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळण्याची जास्त शक्यता आहे याबद्दल काही अंदाज वर्तवण्यात आलेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : नवं वर्ष नोकऱ्यांच्या क्षेत्रात मोठे बदल घेऊन येऊ शकतं.2020 या वर्षात कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळण्याची जास्त शक्यता आहे याबद्दल काही अंदाज वर्तवण्यात आलेत.नव्या वर्षात डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नोकऱ्यांची संधी जास्त आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, रोबोटिक्स, ब्लॉकचेन या क्षेत्रात ट्रेनिंग घेतलेल्या लोकांना चांगली संधी आहे. 2020 मध्ये या संधी दुप्पट होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

60 हजारपेक्षा जास्त नोकरीच्या संधी

याच दरम्यान बिझनेसमधल्या अनिश्चततेमुळे बाकीच्या क्षेत्रात नोकरभरती कमी करण्यात आली आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार पुढच्या वर्षी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 60 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध असतील. यामध्ये डेटा अॅनॅलिटिक्स, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, डेटा सायन्स, ML, NLP, डेटा व्हिज्युअलायझेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, AI आणि ब्लॉकचेन यासारख्या नोकऱ्यांचा समावेश असेल.

(हेही वाचा : खूशखबर! 31 डिसेंबरच्या आधी मिळणार SBI च्या या योजनेचा फायदा)

पगारवाढीची मागणी

या कौशल्यांची मागणी वाढल्याने बरेच उमेदवार नोकरीमध्ये 35 ते 60 टक्के पगारवाढीची मागणी करतायत. डेटा सायन्ससारख्या क्षेत्रात काही जण 100 टक्क्यांपेक्षाही जास्त पगाराची मागणी करतायत.

अशा कौशल्यपूर्ण लोकांना 3 लाख रुपयांपासून 1 कोटींपर्यत पॅकेजची ऑफर मिळू शकते. यामध्ये छोट्या पदांवर काम करणाऱ्यांसाठी 4 हजार 500 संधी आहेत. यामध्ये स्टार्टअप कंपन्याही टॅलन्ट आकर्षित करण्याच्या शर्यतीत आहेत आणि ऑफरच्या बाबतीत मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करतायत.

============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobsmoney
First Published: Dec 26, 2019 09:07 PM IST

ताज्या बातम्या