नवीन वर्षात या कर्मचाऱ्यांना मिळणार जिओ सिम, ९९ रुपयांत सगळंच मिळेल फ्री

नवीन वर्षात या कर्मचाऱ्यांना मिळणार जिओ सिम, ९९ रुपयांत सगळंच मिळेल फ्री

गेल्या सहा वर्षांपासून एअरटेल रेल्वेला १.९५ लाख मोबाइल फोन कनेक्शन सेवा उपलब्ध करुन देत आहे. यासाठी रेल्वे एअरटेलला वर्षाचे १०० कोटी रुपये बिल स्वरुपात द्यायचे.

  • Share this:

नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०१८- रिलायन्स जिओ इन्फोकॉम नवीन वर्षापासून म्हणजे १ जानेवारीपासून भारतीय रेल्वेला सेवा देणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार यामुळे रेल्वेचे फोन बिल किमान ३५ टक्क्यांनी कमी होईल.

आतापर्यंत रेल्वेची दूरसंचार सेवा देणारी कंपनी ही भारती एअरटेल आहे. गेल्या सहा वर्षांपासून एअरटेल रेल्वेला १.९५ लाख मोबाइल फोन कनेक्शन सेवा उपलब्ध करुन देत आहे. याचा उपयोग रेल्वे कर्मचारी देशभरात ‘क्लोज युझर ग्रुप’ UCG स्वरुपात करतात. असं म्हटलं जातं की, यासाठी रेल्वे एअरटेलला वर्षाचे १०० कोटी रुपये बिल स्वरुपात द्यायचे. एअरटेलसोबतचा करार ३१ डिसेंबरला संपणार आहे.

रेल्वे बोर्डाने २० नोव्हेंबरला जारी केलेल्या आदेशात रेलटेलला भारतीय रेल्वेसाठी नवीन सीयूजी योजना शोधण्याचे सांगण्यात आले आहे. कारण एअरटेलची योजना येत्या ३१ डिसेंबरला संपणार आहे. रेलटेनने नवीन सीयूजी योजनेसाठी रिलायन्स जिओ इन्फोकॉमला संधी दिली आहे.

आदेशमध्ये सांगण्यात आले आहे, नवीन सीयूजी १ जानेवारी २०१९ पासून लागू करण्यात येईल. या आदेशात कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या दरांचाही तपशील आहे. सीयूजी सेवा वापरणारे कर्मचारी देशभरातील ग्रुपमधील कोणत्याही व्यक्तीला मोफत कॉल तसेच मेसेज करु शकतो. या योजनेत रिलायन्स जीओ ४जी आणि ३जी सेवा उपलब्ध करुन देत आहे.

चार पॅकेजमध्ये उपलब्ध असेल सेवा

कंपनीने रेल्वेला चार वेगळे पॅकेज दिले आहेत. यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी १२५ रुपये महिन्यांचे भरुन ६० जीबीचा प्लॅन उपलब्ध करुन दिला आहे. संयुक्त सचिन स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी ९९ रुपये मासिक शुल्क भरून ४५ जीबीचा प्लॅन तर क वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी ६७ रुपयांचा ३० जीबीचा प्लॅन आणि एसएमएससाठीचा ४९ रुपयांचा प्लॅन दिला आहे.

नियमित ग्राहकांसाठी जियोने २५ जीबीचा प्लॅन १९९ रुपयांमध्ये उपलब्ध केला आहे. यानंतर ग्राहकांना टॉपअपसाठी १ जीबीसाठी २० रुपये भरावे लागणार आहेत.

VIDEO: भय्यू महाराजांच्या आत्महत्येपासून ब्लॅकमेलिंगपर्यंत...सेवादार विनायक पहिल्यांदाच कॅमेरासमोर

First published: December 29, 2018, 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading