इथे ऑनलाइन करा गुंतवणूक, सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त मिळेल व्याज

इथे ऑनलाइन करा गुंतवणूक, सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त मिळेल व्याज

इथे गुंतवणूक करणं सहज शक्य आहे आणि मिळणारं व्याजही दुसऱ्या बचत योजनांपेक्षा जास्त आहे.

  • Share this:

मुंबई, 24 मे : पोस्ट ऑफिसमधली बचत योजना लोकप्रिय आहे. यात तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि त्यात वृद्धीही होते. यातली रिकरिंग डिपाॅझिट जास्त फायदेशीर आहे. इथे गुंतवणूक करणं सहज शक्य आहे आणि मिळणारं व्याजही दुसऱ्या बचत योजनांपेक्षा जास्त आहे. आरडी ग्राहक दर महिन्याला ऑनलाइनही पैसे गुंतवू शकतात.

धक्कादायक निकाल! निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार

इंडिया पोस्ट पेमेंट बँकद्वारे मिळेल सुविधा

पोस्ट आॅफिसनं आॅनलाइन पैसे डिपाॅझिट करण्याची सुविधा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ( Indian Post Payments Bank )द्वारे दिलीय. यासाठी ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आरडी खात्याशी IPPBला लिंक करायला हवी. म्हणजे तुम्ही आयपीपीबी खात्याशी ऑनलाइन किंवा आयपीपीबी अॅपद्वारे ( IPPB) दर महिन्याला आरडीची रक्कम भरू शकता.

LIVE Lok Sabha Election Result 2019: भारताच्या उज्ज्वल भविष्याची गॅरेंटी - नरेंद्र मोदी

आरडीचे फायदे

रिकरिंग डिपाॅझिट गुंतवणुकीच्या सेव्हिंगवर अवलंबून असतं. तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवू शकता.

आरडीमध्ये सुरुवातीपासून शेवटापर्यंत व्याजदर समान राहतो. डिपाॅझिटवर व्याजदर सुरुवातीपासून लाॅकइन होतो. म्हणजे व्याजदर कमी झाला तरी आरडीवर फायदा होतो.

रिकरिंग डिपाॅझिटवर सेव्हिंग मॅनेजमेंट सोपं जातं. पुन्हा पुन्हा फिक्स्ड डिपाॅझिटच्या त्रासातून मुक्ती मिळते.

जास्तीत जास्त म्हणजे 10 वर्षांसाठी आरडी ठेवता येते.

निवडणूक निकालानंतर आता 'हे' शेअर्स वधारणार, भरपूर पैसे मिळवण्याची संधी

बँकेपेक्षा जास्त फायदा

देशाची सर्वात मोठी बँक SBI आपल्या आरडीवर 6.80 ते 6.85 टक्के व्याज देते. पण पोस्ट आॅफिस सध्या 7.30 टक्के वर्षाला व्याज देतं. पोस्ट आॅफिसमध्ये तुम्ही 5 वर्षांसाठी आरडी ठेवू शकता. तर बँकेत 10 वर्षांसाठी.

खातं उघडणं आहे सोपं

तुम्ही कुठल्याही पोस्ट आॅफिसमध्ये खातं उघडू शकता. एकापेक्षा जास्त खातीही उघडू शकता. छोट्या मुलांच्या नावेही खातं उघडू शकता. ती 10 वर्षांची झाल्यावर स्वत: चालवू शकतील. जाॅइंट अकाउंटही उघडता येईल.

SPECIAL REPORT: सलग दुसऱ्यांदा सुशीलकुमार शिंदेंना पराभव का पत्करावा लागला?

First published: May 24, 2019, 10:05 AM IST

ताज्या बातम्या