खूशखबर! आता इंटरनेटशिवाय करता येतील RuPay कार्डवरून पैशांचे व्यवहार, वाचा सविस्तर

खूशखबर! आता इंटरनेटशिवाय करता येतील RuPay कार्डवरून पैशांचे व्यवहार, वाचा सविस्तर

पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रुपे (RuPay) एक खास सेवा प्रदान करत आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही इंटरनेटशिवाय पेमेंट करू शकता. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रुपे (RuPay) एक खास सेवा प्रदान करत आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही इंटरनेटशिवाय पेमेंट करू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 डिसेंबर: पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रुपे (RuPay) एक खास सेवा प्रदान करत आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही इंटरनेटशिवाय पेमेंट करू शकता. बुधवारी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अशी माहिती दिली आहे की,  ते रुपे कॉन्टॅक्टलेस कार्डमध्ये ऑफलाइन पेमेंटसाठी नवीन फीचर जोडत आहेत. याबाबत प्रायोगिक तत्वावरही काम सुरू झाले आहे. पण या व्यवहारासाठी त्या क्षेत्रामध्ये पॉईंट ऑफ सेल (POS) असणं आवश्यक आहे. एनपीसीआयने म्हटले आहे की रीलोड करण्यायोग्य RuPay NCMC कार्डमुळे ग्राहकांना व्यवहार सहजपणे करता येईल.

एनपीसीआयने म्हटले आहे की रुपे कार्डमध्ये अशी वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत, ज्यामुळे मर्यादित इंटरनेट उपलब्ध असलेल्या भागातही ऑफलाइन व्यवहार शक्य होईल. यासह किरकोळ व्यवहारासाठी सोयीस्कर अशा वॉलेटची सुविधा देखील देण्यात आली आहे. NPCI ने म्हटले आहे की रुपे कार्डधारक मर्यादित नेटवर्क असलेल्या भागात विक्री केंद्रांवरील पीओएसवर ऑफलाइन पेमेंट करू शकतात.

(हे वाचा-SBI अलर्ट! बँक ग्राहकांनी कुणाला 'ही' माहिती दिली असेल तर होईल लाखोंचं नुकसान)

सोप्या पद्धतीने होईल पेमेंट

नवीन फीचरमुळे कमी इंटरनेट असणाऱ्या किंवा इंटरनेट सेवा नसणाऱ्या क्षेत्रात लहान ट्रान्झॅक्शन करता येतील. यामध्ये मेट्रो तिकिट, बस तिकिट, टॅक्सीभाडे इ. पेमेंट्सचा समावेश आहे. साधारण व्यवहारांपेक्षा हे व्यवहार वेगवान असतील, हे या नवीन सुविधेचं वैशिष्ट्य आहे. कमी वेळात हे काम पूर्ण करता येईल.

(हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये आजही तेजी,सोनखरेदीआधी तपासा नवे दर)

ऑनलाइन पेमेंट मोडपेक्षा काय वेगळेपण?

NPCI चे प्रमुख नलिन बन्सल यांच्या मते, यामुळे कॅशलेस इकॉनॉमीच्या स्वप्नाला मदत मिळेल. देशामधील डिजिटल पेमेंट्सा रुपे कॉन्टॅक्टलेस ऑफलाइन फीचरमुळे मजबुती मिळेल. याप्रकारच्या सेवेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) काही दिवसांपूर्वीच मंजुरी दिली होती. ही सुविधा केवळ छोट्या पेमेंट्ससाठी उपलब्ध आहे. ही पद्धती ऑफलाइन पेमेंट मोडपेक्षा वेगळी आहे. याकरता कार्डधारकाला वेगळ्या वॉलेटची आवश्यकता असते, ही  सुविधा आता रुपे कार्डधारकांना देखील मिळणार आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 18, 2020, 11:32 AM IST
Tags: money

ताज्या बातम्या