मोदी सरकार घर खरेदी करणाऱ्यांना देऊ शकते खास भेट, होईल 'ही' घोषणा

मोदी सरकार घर खरेदी करणाऱ्यांना देऊ शकते खास भेट, होईल 'ही' घोषणा

Modi Government, Housing Sector - मोदी सरकार हाउसिंग सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक घोषणा करू शकते

  • Share this:

मुंबई, 26 जून : मोदी सरकार हाउसिंग सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक घोषणा करू शकते. सरकारला वाटतंय यामुळे नोकरीची संधी वाढेल आणि सुस्त झालेल्या अर्थव्यवस्थेत जीव येईल. म्हणून सरकार बजेटमध्ये घर खरेदी करणाऱ्यांना टॅक्समध्ये सवलत देण्याची मोठी घोषणा करू शकतं. शिवाय परवडेल अशी घरं खरेदी करण्यावर कमी व्याज आणि दुसरं घर खरेदी केलं तर फायदा होईल.

बजेटमध्ये होऊ शकते घोषणा

इकाॅनाॅमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार सरकारची योजना आहे की रियल इस्टेट सेक्टरला उर्जितावस्था द्यायची. त्यामुळे लोकांबरोबर सरकारचाही फायदा होईल. याची घोषणा 5 जुलैच्या बजेटमध्ये होऊ शकते.

मुंबई विद्यापीठात 67 जागांवर भरती, 'या' पदांसाठी मागवलेत अर्ज

बांधकाम सुरू असलेल्या घरांवर व्याज नाही

सरकार बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या गृहकर्जावर व्याज घेणार नाही. घर खरेदी करणाऱ्यांना व्याजावर जास्त सवलत मिळण्याची घोषणा होऊ शकते. 2014मध्ये केंद्र सरकारनं व्याजावर मिळणारी सवलत 1.5 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये केलीय. यामुळे सरकारला वाटतंय फ्लॅट खरेदी वाढेल आणि नव्या प्रकल्पांवर काम सुरू होईल.

45 ते 60 हजार रुपयांचा होईल फायदा

सरकारनं हे पाऊल उचललं तर 30 टक्के कर देणाऱ्यांना दर वर्षी 45 ते 60 हजार रुपये फायदा होऊ शकतो. अगोदर लोकांना दुसरं घर खरेदी करताना व्याजात सूट मिळावी म्हणून सांगावं लागायचं. त्यासाठी कुठली मर्यादा निश्चित नव्हती. यामुळे लोकांना भाड्यावर मिळणाऱ्या रकमेमुळे होणारं नुकसान कमी करायला मदत मिळेल.

सावधान ! SWIGGY, ZOMATOवरील ऑर्डरमुळे तुमचा खिसा कापला जातोय

'या' कामासाठी पुरुषांपेक्षा जास्त कर्ज घेतात महिला

CREDAI नं मागणी केली होती की सेक्शन 80C अनुसार 5 लाख प्रिंसिपलवर दर वर्षाला 5 लाखासाठी 5 वर्षासाठी कर सवलत द्यावी आणि जी व्याज दर सूट आहे ती 2 लाख रुपयांना वाढून 4 लाख रुपये करावी. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं की मोठी सूट देणं शक्य होणार नाही, पण किती द्यावी याचा विचार सुरू आहे.

VIDEO: मन एक करीं, म्हणे मी जाईन पंढरी| उभा विटेवरी तो पाहेन सावळा|

First published: June 26, 2019, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading