15 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

15 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

Mudra Scheme, Sanitary Pads - तुम्हाला कमी पैशात व्यवसाय सुरू करायचा असेल तर चांगली संधी आहे. सरकारची मदतही मिळेल.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाची माहिती देतोय, त्याला मागणीही भरपूर असते आणि सरकारी मदतही मिळते. सरकार यासाठी 90 टक्के मदत करते. हा व्यवसाय आहे सॅनेटरी नॅपकिन्सचा. तुम्ही 15 हजार रुपये गुंतवणूक करून सॅनेटरी नॅपकिन्सचं युनिट सुरू करू शकता. पहिल्याच वर्षी तुम्ही 1.10 लाख रुपयापर्यंत कमवू शकता. दुसऱ्या वर्षी दुप्पट फायदा होईल.

छोट्या रूममध्ये तुम्ही सुरू करू शकता युनिट

सरकारनं मुद्रा स्कीमच्या बिझनेस प्रोजेक्टमध्ये सॅनेटरी नॅपकिन्सचाही समावेश केलाय. प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे रोज 1440 नॅपकिन्स युनिटमध्ये तयार होऊ शकतात. 8 नॅपकिन्स एका पॅकेटमध्ये पॅक केले तर रोज 180 पॅकेट्सचं प्राॅडक्शन होऊ शकतं. या अहवालाप्रमाणे तुम्हाला सॅनेटरी नॅपक्निसचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला फक्त 16X16 फुट रूममध्ये युनिट लावायचंय.

World Cup : इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा ICCचा 'हा' नियम आहे तरी काय?

15 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता प्रोजेक्ट

या अहवालाप्रमाणे समजा तुम्ही 180 पॅकेटचं रोज प्राॅडक्शन होईल, असं युनिट लावलंत तर तुमचा प्रोजेक्ट 1.45 लाख रुपयांपासून सुरू होईल. यासाठी तुम्हाला 90 टक्के म्हणजे 1.30 लाख रुपयांचं मुद्रा कर्ज मिळेल. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडून 15 हजार रुपयेच गुंतवावे लागतील.

Chandrayaan2 चं आजचं प्रक्षेपण रद्द, शास्त्रज्ञांनी शेवटच्या क्षणी घेतला निर्णय

कच्चा माल आणि मशिनरी

तुम्हाला डिफायबरेशन मशीन, कोर मॉर्निंग मशीन, सॉफ्ट टच सीलिंग मशीन, नॅपकिन कोर डाय, युवी ट्रीट युनिट घ्यावं लागेल. हे मशीन तुम्हाला जवळजवळ 70 हजार रुपयांत मिळेल. तुम्हाला वुड पल्प, टॉप लेयर, बॅक लेयर, रिलीज पेपर, गम, पॅकिंग कवर कच्चा माल म्हणून घ्यावा लागेल. एक महिन्यासाठी कच्चा माल जवळजवळ 36 हजार रुपयांमध्ये मिळेल.

सचिनच भारी; या World Cupमध्येही मोडता आला नाही मास्टर ब्लास्टरचा विश्वविक्रम!

काय असेल प्राॅडक्शन किंमत?

या अहवालात म्हटलंय की, तुम्ही वर्षभर 300 दिवस काम केलंत तर 54000 पॅकेटचं प्राॅडक्शन होईल. त्याची किंमत अशी असेल, कच्चा माल -4.32 लाख रुपये, पगार - 84 हजार, प्रशासकीय खर्च - 27 हजार, डिप्रेसिएशनवर 8 हजार रुपये, इन्शुरन्सवर 800 रुपये, रिपेअर मेन्टेनन्सवर 4 हजार रुपये, भांडवलावरचं व्याज 18 हजार रुपये, विक्रीचा खर्च 16200 रुपये, म्हणजे एकूण खर्च 5.90 लाख रुपये.

किती होईल कमाई?

या अहवालानुसार तुम्ही सॅनेटरी नॅपकिन्सचं 1 पाकीट 13 रुपयांना विकलं तर एकूण 7.02 लाख रुपयांची एकूण विक्री होईल. म्हणजे फायदा एकूण 1.10 लाख रुपये होईल. तो दुसऱ्या वर्षी वाढू शकतो.

VIDEO: औरंगाबादमध्ये खळबळ, पायात साखळी कुलूप बांधून फिरतेय महिला

First published: July 15, 2019, 12:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading