लवकरच किराणा मालाच्या दुकानात ATM कार्ड वापरून काढता येतील पैसे

लवकरच किराणा मालाच्या दुकानात ATM कार्ड वापरून काढता येतील पैसे

खर्च वाढतात म्हणून बँका ATM बंद करणार आहे. म्हणून किराणा मालाच्या दुकानातून पैसे मिळण्याची शिफारस केली गेलीय.

  • Share this:

मुंबई, 06 जून : लवकरच तुम्ही ATM िशवाय तुमच्या किराणा मालाच्या दुुकानातून पैसे काढू शकता. RBIनं देशात ATM ची संख्या कमी होते म्हणून एक समिती स्थापन केली. या समितीनं छोट्या शहरांमध्ये दुकानदारांद्वारे पैसे देण्याची शिफारस केलीय. खर्च वाढतात म्हणून बँका ATM बंद करणार आहे. म्हणून किराणा मालाच्या दुकानातून पैसे मिळण्याची शिफारस केली गेलीय.

कॅश इन कॅश आऊट नेटवर्क करेल काम

इकाॅनाॅमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार समितीनं कॅश आऊट कॅश इन ( CICO ) चा प्रस्ताव दिलाय. या नेटवर्कद्वारे ग्राहक OR कोड आणि आधारवर आधारित असलेल्या पेमेंट चॅनेलद्वारे जवळच्या दुकानातून डिजिटल मनी पैशात मिळू शकेल. कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी दीपक शर्मा यांच्या म्हणण्याप्रमाणे, CICO माडेल कॅश आउट सुविधांसाठी तीन कोटी PoS मशीनच्या रिटेल पाॅइंटची गरज असेल.

RBI नं केली रेपो दरात कपात, आता गृहकर्ज कमी होण्याची शक्यता

RBI ची मोठी घोषणा, ग्राहकांना आता द्यावे नाही लागणार बँकेचे 'हे' दर

विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स

गेल्या वर्षभरात 40पैकी 30 बँकांनी एटीएमची संख्या कमी केलीय. देशातली सर्वात मोठी सरकारी बँक SBI नं जवळजवळ एक हजार एटीएम बंद केलेत. दरम्यान, बँकांनी जवळजवळ 6.4 लाख नवे PoS मशीन्स वितरीत केली आहेत. इथे कार्ड स्वाइप करून दुकानदारांकडून पैसे घेता येतील.

भडकलेल्या वळूचं भांडण सोडवण्यासाठी केला 'हा' अजब उपाय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ATMretail
First Published: Jun 6, 2019 03:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading