कचऱ्यापासून व्यवसाय सुरू करून करतायत कोटींची कमाई, तुम्हालाही आहे संधी

कचऱ्यापासून व्यवसाय सुरू करून करतायत कोटींची कमाई, तुम्हालाही आहे संधी

नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर फक्त पैसे असून उपयोगी नाही. हवी असते ती नवी आयडिया.

  • Share this:

मुंबई, 28 मे : नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर फक्त पैसे असून उपयोगी नाही. हवी असते ती नवी आयडिया. अशीच कल्पना सुचली अहमदाबादचे संदीप पटेल आणि त्यांच्या 3 मित्रांना. रस्त्यावरच्या कचऱ्यातून पैसे कमवण्याची आयडिया त्यांना सुचली. संदीप, चिराग, ध्रुमिन आणि रवी यांची कंपनी नेपरा रिसोर्स मॅनेजमेंट सोसायटी अहमदाबादमध्ये अनेक शहरं आणि कलेक्शन सेंटरमधून सुका कचरा गोळा करते. त्याचं प्रोसेसिंग प्लान्टमध्ये टाकून मटेरियल बनवलं जातं. त्या मटेरियलला पेपर, प्लास्टिक, स्टेशनरी बनवणाऱ्या कंपनींना विकलं जातं.

कल्पनेला बनवला व्यवसाय

नेपरा कंपनी वेस्ट मॅनेजमेंटचं काम करते. प्रोसेस केलेल्या या मटेरियलला पेपर, प्लॅस्टिक, स्टेशनरी बनवणाऱ्या कंपनींना विकलं जातं. या कंपनींकडून रिव्ह्येन्यूचा मोठा भाग येतो. कचरा जमा करण्यासाठी महानगरपालिका मदत करतेच. शिवाय कचरा उचलणाऱ्या कामगारांचीही मदत घेतली जाते. यामुळे या कामगारांचाही फायदा होतो.

HSC result : बारावीचा निकाल जाहीर; News18 Lokmat वर थेट पाहता येणार

असं चालतं कामकाज

कंपनीनं 6 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी गुंतवणूक केलीय. प्रोसेसिंग प्लँटमध्ये 1 कोटी गुंतवणूक केली.

HSC RESULT LIVE : बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा कोकण विभागानेच मारली बाजी

हा प्लँट एका दिवसाचा 100 मेट्रिक कचरा प्रोसेस करू शकतो. कंपनीकडे कचरा गोळा करणारे 1800 आहेत, तर 2500 कलेक्शन्स पाॅइंट्स आहेत. कंपनीच्या रिव्हेन्यूमध्ये चांगली वाढ दिसतेय.

MSBSHSE, Maharashtra Class HSC/12th Result 2019: रिझल्टच्या दिवशी 'असे' राहा टेन्शन फ्री

5 वर्षांत एक हजार कोटींचं लक्ष्य

3 वर्षांत 25 शहरांमध्ये पोचण्याचं लक्ष्य कंपनीनं ठेवलंय. कंपनी 44 कोटींचं फंडिंग गोळा करतेय. पुढच्या पाच वर्षांत 1 कोटी कमाई होईल, असं लक्ष्य ठेवलंय.

VIDEO: जुलूसमध्ये हाहाकार; वळू झाला UNCONTROL, अनेकांना चिरडलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading