आता 'असे' मिळवता येतील घरबसल्या पैसे; 2 वर्षांत 2 लाख कमवण्याची संधी देणारी योजना

आता 'असे' मिळवता येतील घरबसल्या पैसे; 2 वर्षांत 2 लाख कमवण्याची संधी देणारी योजना

Solar Panel, Modi Government - सौरउर्जा तयार करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 08 ऑगस्ट : मोदी सरकार वीज वाचवण्यासाठी अनेक योजना सुरू करतंय. त्यातलीच एक म्हणजे केंद्र सरकारची सोलर पाॅलिसी. सूर्याची उर्जा वापरून वीजनिर्मिती करण्याचा हा प्लॅन आहे. आता गुजरात सरकारनं नवं सौर धोरण तयार केलंय. हळूहळू देशभर हे सौर धोरण राबवलं जाईल.

सौर धोरणाअंतर्गत गुजरातमध्ये 2 वर्षात 2 लाख घरांमध्ये सौर पॅनल लावण्याची योजना आहे. हे पॅनल लावण्यासाठी स्वस्त दरात बँकेचं कर्ज मिळणार आहे. सौरउर्जेतून मिळणाऱ्या विजेचा उपयोग घरमालक करू शकेल. जे कोणी हे पॅनल लावतील ते स्वस्त दरात वीज विकू शकतील.

पाकिस्तानात हाहाकार! भारताच्या दुप्पट किमतीत विकलं जातंय सोनं

व्याजावर सबसिडी आणि वीज खरेदीच्या किमतीची घोषणा लवकरच होईल. त्यासाठी सरकारला आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आणि वीज स्टोअरेजसाठी ग्रिड तयार करावं लागेल. त्या ग्रिडची किंमत ठरवावी लागेल. घरमालक ते ग्रिड खरेदी करून त्यावर सौरउर्जेची निर्मिती करेल.

मोठी बातमी ! आता 4 तास आधीच विमानतळावर पोहोचावंच लागेल कारण ...

गुजरातनंतर महाराष्ट्रात हे होणार आहे. पूर्ण देशभरात प्रत्येक राज्या सौरउर्जेतून वीजनिर्मिती हा प्रकल्प चालवला जाईल. त्याचा फायदा असा की ज्या घरात सौर पॅनल लावलंय, तिथे ही वीज वापरता येईलच. पण अतिरिक्त वीज विकून पैसेही मिळवता येतील. म्हणजेच घरबसल्या चांगला व्यवसाय होईल.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत मिळतात बँकेपेक्षा जास्त पैसे, अशी करा गुंतवणूक

मोदी सरकार बऱ्याच योजना आणतेय. तुम्ही स्वस्त सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर एक चांगली योजना आहे. सरकारच्या एका स्कीमद्वारे तुम्ही स्वस्त दरात सोनं खरेदी करू शकाल. साॅवरेन गोल्ड बाॅण्डची (Sovereign Gold Bond) नवी सीरिज लाँच झाली. या स्कीम अंतर्गत तुम्ही 9 ऑगस्टपर्यंत सोन्याची खरेदी करू शकतात. सरकारनं साॅवरेन गोल्ड बाॅण्ड योजनेच्या नव्या सीरिजमध्ये 3,499 रुपये प्रति ग्रॅम सोन्याची किंमत आहे. 3 ऑगस्टला सोन्याची किंमत 3,674 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजे सरकारच्या स्कीमप्रमाणे तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर तुम्हाला ते 175 रुपये स्वस्त पडेल. गोल्ड बाॅण्डमध्ये गुंतवणूक केली तर व्याजही मिळेल. शिवाय ऑनलाइन खरेदीवर सरकार 50 रुपये सूटही देतेय.

हॉस्पिटलमधून रुग्णांना रेस्क्यू करतानाचा थरार LIVE VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: August 8, 2019, 5:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading