मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आधार लिंक्ड पेमेंट सिस्टममध्ये आता नवीन सुरक्षा फिरच; बोटांच्या बनावट ठशांद्वारे होते फसवणूक

आधार लिंक्ड पेमेंट सिस्टममध्ये आता नवीन सुरक्षा फिरच; बोटांच्या बनावट ठशांद्वारे होते फसवणूक

आधार लिंक्ड पेमेंट सिस्टममध्ये आता नवीन सुरक्षा फिरच

आधार लिंक्ड पेमेंट सिस्टममध्ये आता नवीन सुरक्षा फिरच

आधार कार्डद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला आता आळा बसणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 27 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून आधारद्वारे आर्थिक फसवणूक होऊ शकते, अशी माहिती सगळीकडे फिरत आहे. यासाठी केंद्र सरकारनेही नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. पण, आता हा प्रश्न सुटणार आहे. कारण, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयने आधार सक्षम पेमेंट सिस्टममध्ये एक नवीन सुरक्षा फिचर सादर केले आहे. फिंगरप्रिंट 'लाइव्हनेस' असे या फिचरचे नाव आहे, जे एईपीएसद्वारे पैसे काढण्यासाठी बनावट फिंगरप्रिंटचा वापर रोखण्यास मदत करेल.

पीओएस मशीनमध्ये नवीन फिचर

इकॉनॉमिक टाइम्सने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की हे नवीन सुरक्षा फिचर एईपीएस पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशीनमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडद्वारे जोडले गेले आहे. आता पीओएस वापरण्यात येणारा फिंगरप्रिंट जिवंत व्यक्तीचा आहे की नाही हे ठरवू शकेल. अहवालात, अधिकाऱ्याने असेही निदर्शनास आणून दिले की फसवणुकीच्या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत. (सुमारे 0.005 टक्के).

एईपीएस सक्षम झाल्यापासून, आतापर्यंत 1,507 कोटींहून अधिक बँकिंग व्यवहार झाले आहेत. त्यापैकी सिस्टीममध्ये सुमारे 7.54 लाख बनावट व्यवहार झाले आहेत (अधिकाऱ्याने नमूद केलेल्या टक्केवारीनुसार). देशभरात एईपीएसच्या गैरवापराच्या अनेक अहवालांनंतर नवीन सुरक्षा फिचर जलद-ट्रॅक आणि लागू करण्यात आले.

बोटांचे ठसे घेऊन अशा प्रकारे फसवणूक केली जात होती

वृत्तानुसार, फिंगरप्रिंटचा वापर करून बनावट व्यवहार केले गेले, जे सिलिकॉन पॅडवर क्लोन करुन करण्यात आले. हे बोटांचे ठसे जमिनीच्या व्यवहाराच्या नोंदीतून कॉपी केले गेले होते, जे जमीन-महसूल विभागाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले होते.

वाचा - Chrome Alert: गुगल क्रोम वापरत असाल तर सावधान, बँक खातं होऊ शकतं रिकामं

अवैध व्यवहारांचा मागोवा घेण्यास मदत होईल

यावर, ईजीपे चे संस्थापक आणि सीईओ शम्स तबरेझ म्हणाले की नवीन सुरक्षा फिचर बनावट बोटांचे ठसे आणि बेकायदेशीर व्यवहारांचा मागोवा घेण्यास मदत करेल, त्यामुळे चांगले ऑथेंटिकेशन आणि सिक्योरिटी सुनिश्चित करेल.

सरकारकडे देशात 50 लाख एईपीएस पीओएस मशीन

ते म्हणाले, "अलीकडच्या काळात आम्ही बनावट आणि फसवणुकीच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांचा समावेश आहे, त्यांनी अज्ञात ठिकाणांहून आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्राी केल्या आहेत, त्यांचे बनावट बोटांच्या ठशांमुळे आर्थिक नुकसान होत आहे." सध्या, सरकारकडे देशात सुमारे 50 लाख एईपीएस पीओएस PoS मशीन आहेत, त्यापैकी 35 लाख दरमहा सक्रिय आहेत.

बँका आणि एनबीएफसी साठी गाइडलाईन्स जारी

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी यापूर्वी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी गाइडलाईन्स जारी केली होती. गाइडलाईन्सनुसार, बँकांना फसवणुकीची तक्रार दाखल केल्यापासून पाच दिवसांत कळवण्याचे आदेश देण्यात आले होते.

एनपीसीआयने बँकांना त्याच कालावधीत घटनांचा तपशीलवार तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पुढे, बँकांना त्यांचे युक्तिवाद सादर करण्यासाठी 10 दिवसांचा अवधी असेल. यात फसवणुकीची जबाबदारी निश्चित करावी लागणार आहे.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link