Home /News /money /

New Rules: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 1 एप्रिलपासून पैसे काढण्यासाठी असा द्यावा लागणार चार्ज

New Rules: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 1 एप्रिलपासून पैसे काढण्यासाठी असा द्यावा लागणार चार्ज

नव्या नियमांनुसार, पैसे काढण्यासाठी आणि डिपॉजिटसाठीचे नियम वेगवेगळ्या पोस्ट ऑफिस खात्यावर लागू होतील आणि ही रक्कम पोस्ट ऑफिसमधील ग्राहकांच्या खात्याच्या स्वरुपानुसार बदलू शकते.

  नवी दिल्ली, 7 मार्च : इंडिया पोस्ट (Post Office) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2021 पासून पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी काही नवे नियम लागू होणार आहेत. नव्या नियमांनुसार, पैसे काढण्यासाठी आणि डिपॉजिटसाठीचे नियम वेगवेगळ्या पोस्ट ऑफिस खात्यावर लागू होतील आणि ही रक्कम पोस्ट ऑफिसमधील ग्राहकांच्या खात्याच्या स्वरुपानुसार बदलू शकते. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट ग्राहकांसाठी नव्या नियमानुसार, पोस्ट ऑफिस जीडीएस (Gramin Dak Seva) ब्रांचमध्ये पैसे काढण्याची सीमा वाढेल. आता प्रति व्यक्ती पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. या काळात अनेक बँकांनी बचत खात्यावरील व्याज दरात कपात केली आहे, तर पोस्ट ऑफिस बचत खात्यातील व्याज दर प्रति वर्ष 4 टक्के आहे. पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी कॅश जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी नवे नियम - - इंडिया पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिस जीडीएस (ग्रामीण डाक सेवा) शाखांमध्ये पैसे काढण्याची मर्यादा 5000 वरून 20000 प्रति ग्राहक करण्यात आली आहे. - कोणताही ब्रांच पोस्ट मास्तर (BPM) एका दिवसात खात्यात 50000 हून अधिक रक्कम रोख ठेवीसाठी स्वीकारणार नाही. त्याशिवाय सार्वजनिक भविष्य निधी (PPF), वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), मासिक उत्पन्न योजना (MIS), किसान विकास पत्र (KVP), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC) RBST CBS ऍपमध्ये उपलब्ध केल्या जातात. या खात्यात जमा रक्कम केवळ फॉर्म किंवा चेकद्वारे स्वीकारली जाईल.

  (वाचा - LPG Gas Cylinder Subsidy Status:तुमच्या अकाउंटमध्ये गॅस सबसिडी येते का?असं तपासा)

  पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटसाठी कमीत कमी 500 रुपये रक्कम ठेवणं आवश्यक आहे. जर अकाउंटमध्ये कमीत कमी रक्कम नसेल, तर 100 रुपये अकाउंट मेंटनन्स शुल्क रुपात कापले जातील. सेव्हिंग अकाउंटमधून महिन्याला चार वेळा कॅश काढल्यास, कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परंतु त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये किंवा काढलेल्या एकूण रकमेच्या 0.5 टक्के शुल्क आकारलं जाईल. पैसे जमा करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. सेव्हिंग किंवा करंट अकाउंटसाठी प्रत्येक महिन्याला 25000 रुपये काढल्यास कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परंतु त्यानंतरच्या प्रत्येक काढलेल्या एकूण रकमेपैकी 25 रुपये किंवा 0.5 टक्के शुल्क आकारलं जाईल.

  (वाचा - कमी पैशात सुरू करा हा जबरदस्त व्यवसाय; दर महिन्याला होईल 40 हजारांपर्यंत कमाई)

  तसंच ग्राहकांना मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी 5 रुपये द्यावे लागतील. जर मर्यादा संपल्यानंतर पैशाचा व्यवहार केला, तर तुमच्या खात्यातून व्यवहाराच्या रकमेपैकी 1 टक्का वजा केला जाईल, जो किमान 1 रुपया आणि जास्तीत जास्त 25 रुपये असेल. या चार्जेसवर जीएसटी आणि सेसही लावण्यात येईल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Post office

  पुढील बातम्या