बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! चेक पेमेंट करण्याची पद्धत बदलणार, वाचा कधीपासून लागू होणार नियम

बँकिंग फ्रॉड (Banking Fraud) नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जानेवारीपासून एक नवीन प्रणाली आणणार आहे. यानुसार ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे

बँकिंग फ्रॉड (Banking Fraud) नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जानेवारीपासून एक नवीन प्रणाली आणणार आहे. यानुसार ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 डिसेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नवीन वर्षापासून चेक पेमेंट (Cheque Payment) च्या नियमात काही बदल करणार आहे. 1 जानेवारीपासून हे नियम  प्रभावी आहेत. आरबीआयच्या नव्या पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) अंतर्गत चेकच्या माध्यमातून 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेमेंट करताना काही महत्त्वाची माहितीची तुम्हाला दुसऱ्यांदा पुष्टी करावी लागेल. मात्र ही सुविधा खातेधारकावर निर्भर असेल, की त्याला या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे की नाही. देशात वाढणाऱ्या बँकिंग फ्रॉडचा धोका लक्षात घेता आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. चेकच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीवर लागेल लगाम पॉझिटिव्ह पे सिस्टम एक ऑटोमॅटिक टूल आहे, जी चेकच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीवर लगाम लावेल. या प्रणालीअंतर्गत चेक देणाऱ्या व्यक्तीला SMS, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून काही माहिती द्यावी लागेल. याअंतर्गत चेकची तारीख, लाभार्थ्याचं नाव, प्राप्तकर्ता आणि किती रक्कम आहे याबाबत माहिती द्यावी लागेल. (हे वाचा-1 जानेवारीपासून बदलणार डेबिट, क्रेडिट कार्डचे नियम) यानंतर चेक पेमेंटच्या आधी ही माहिती क्रॉस चेक केली जाईल. जर यामध्ये काही गोंधळ असेल तर पेमेंट केले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे संबंधित शाखेला याबाबत माहिती दिली जाईल. आरबीआयने अशी माहिती दिली आहे की अशा परिस्थितीत आवश्यक पावलं उचलली जातील. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन तयार करणार सुविधा पॉझिटिव्ह पे सिस्टमसाठी सीटीएसमध्ये ही नवीन सुविधा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) विकसीत करेल आणि बँकांना उपलब्ध करून देईल. या सुविधेचा लाभ घेणे खातेधारकावर अवलंबून असेल. दरम्यान 5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक पेमेंट असल्यास बँकांकडून हा नियम अनिवार्य केला जाऊ शकतो. सर्व बँकांना चेक क्लिअर किंवा कलेक्शनमधील नवीन नियम लागू करावे लागतील. आरबीआयने सर्व बँकांना 1 जानेवारी 2021 आधी सर्व नवीन नियमांबाबत ग्राहकांना संपूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: