Home /News /money /

ATM मधून पैसे काढण्यापूर्वी आजपासूनचा नवा नियम माहिती आहे का? पाह SBI ने काय सांगितलं

ATM मधून पैसे काढण्यापूर्वी आजपासूनचा नवा नियम माहिती आहे का? पाह SBI ने काय सांगितलं

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण बदललेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे.

  मुंबई, 1 जानेवारी : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून SBI ओळखली जाते. ICICI नंतर आता SBI बँकेनं ATMबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण बदललेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कायम ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरवण्यावर भर देत असते. एटीएमद्वारे होणारे घोटाळे आणि ग्राहकांचे चोरीला परस्पर चोरीला जाणारे पैसे अशा फ्रॉडपासून ग्राहकांना अधिक संरक्षण देण्यासाठी हे नियम बदलण्यात आले आहेत. स्टेट बँकेनं नेमकं काय नवा नियम आणला आहे जाणून घ्या. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नव्या नियमानुसार तुम्हाला जर रात्री 8 ते सकाळी 8 म्हणजेच या 12 तासांत केव्हाही पैसे एटीएमद्वारे काढायचे असतील तर तुमच्या बँकेत रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पासवर्ड येईल. हा पासवर्ड तुम्ही एकदाच वापरू शकता. हा ओटीपी तुम्हाला टाकून तुमच्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढणाऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तुम्ही काय करायचं आहे. सर्वात प्रथम तुम्ही एटीएम वापरत असाल तर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्यासोबत अपडेट करून घ्या. तुम्ही रात्री पैसे काढत असाल तर बँक तुम्हाला तुमच्या सजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी सेंड करेल. हा ओटीपी नंबर कुणालाही सांगू नये. तो एकदाच वापरला जाऊ शकतो. त्यासाठी काही सेकंदाचा कालावधीही मर्यादीत असतो. ही प्रक्रिया अन्य बँकेतील एटीएममध्ये सध्या तरी काम करणार नाही.असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. एटीएममधून अथवा बँकेतून होणारे बनावट ट्रॅन्झॅक्शन आणि ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी ह्या नियमाची अंमलबजावणी केली जात आहे. हेही वाचा-एअरटेल पेमेंट बँकेची 24x7 सेवा, बँक बंद झाल्यावरही घरबसल्या ट्रान्सफर करा पैसे यासोबतच तुम्ही 5 पेक्षा जास्त वेळा ATM मधून पैसे काढत असाल आणि तुमचं सॅलरी अकाऊंट नसेल तर तुम्हाला बँकेकडून काही शुल्क आकारण्यात येणार आहे. हा नियम आताही लागू आहेच मात्र नव्या वर्षातही हा नियम कायम असणार आहे. याआधी ICICI बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी एटीएम आणि इतर ट्रान्झाक्शनसाठी अतिरिक्त शुल्क आणि काही नवीन नियम लागू केले होते. RBI लवकरच बदलणार ATM संबंधीचे नियम; ग्राहकांवर होणार हा परिणाम विविध बँकांची ATM कार्ड वापरण्याचे नियम बदलणार आहेत. रिझर्व बँकेने गुरुवारी यासंदर्भात सूतोवाच केलं. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी ATM Service Provider नवी नियमावली 31 डिसेंबरला जारी होणार आहे. त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं RBI ने सांगितलं आहे.AT सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात येणार आहेत. व्यापारी बँका आणि नागरी सहकारी बँकांमध्ये ATM swtich application सेवा पुरवठादाराप्रमाणे बदलतं. त्यासाठीचे नियम नाहीत. ते 31 डिसेंबरला जारी होतील. ते झाल्यानंतर एटीएम वापरण्यासंबंधीचे नियम ग्राहकांसाठीही बदलू शकतात. हेही वाचा- खूशखबर! 31 डिसेंबरच्या आधी मिळणार SBI च्या या योजनेचा फायदा 1 जानेवारीपासून बदलणार पैशांबद्दलचे हे 10 नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम Digital Paymentची सुविधा नसलेल्या उद्योजकांना दरदिवशी होणार 5 हजारांचा दंड

  नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात 16 दिवस बँका बंद, लवकर करून घ्या तुमची कामं

  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: SBI

  पुढील बातम्या