नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : लग्नसराईच्या निमित्ताने तुम्हाला सोन्याची खरेदी करायची असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. 1 जानेवारीपासून सोन्याची खरेदी करण्याचे नियम बदलणार आहेत. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सोनं- चांदीच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग सक्तीचं करण्याला ग्रीन सिग्नल दिला आहे.
सरकारच्या या निर्णयाचा दागिने उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे. देशाच्या दुर्गम भागात हे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी एक वर्षांची मुदत दिली जाईल. ग्राहकांना याचा चांगला फायदा मिळू शकेल.
सध्या 40 टक्के दागिन्यांचं हॉलमार्किंग केलं जातं. हॉलमार्किंग केलेले दागिने हे पूर्णपणे शुद्ध सोन्याचे असतात. भारत हा सोन्याची आयात करणारा मोठा देश आहे. भारतात दरवर्षी 700 ते 800 टन सोनं आयात केलं जातं.
(हेही वाचा : SBI च्या ग्राहकांना ATM सेंटरमध्ये जाण्याची नाही गरज, इथून काढू शकता पैसे)
सोन्याचं हॉलमार्किंग करण्यासाठी देशभरात 400 ते 500 नवी केंद्रं उघडण्यात येणार आहेत. सध्या देशात अशी 700 केंद्र आहेत. सोन्याच्या हॉलमार्किंगसाठी ग्रामीण क्षेत्रात सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
काय असतं हॉलमार्किंग?
हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत सोन्याच्या दागिन्यात शुद्ध सोनं किती आणि इतर धातूंचं प्रमाण किती हे तपासलं जातं. सोन्याच्या शुद्धतेबद्दल अधिकृत प्रमाणपत्र देणं म्हणूनच आता सक्तीचं करण्यात आलं आहे. यासाठी ज्वेलर्सना परवानेही घ्यावे लागतील.
================================================================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा