Home /News /money /

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! आता तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार 7 लाखांचा फायदा

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! आता तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार 7 लाखांचा फायदा

दररोजच्या व्यवहारात आणि ATMमध्ये 2 हजारांच्या नोटा कमी प्रमाणात दिसत असल्याने त्या बंद होणार अशी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यावर सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

दररोजच्या व्यवहारात आणि ATMमध्ये 2 हजारांच्या नोटा कमी प्रमाणात दिसत असल्याने त्या बंद होणार अशी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यावर सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

EDLI योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यास उत्पन्नाचे संरक्षण देणे हा आहे. हा फायदा कंपनी आणि केंद्र सरकार कर्मचार्‍यांना देत आहे.

    नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : केंद्र सरकारने बुधवारी सांगितले की, कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) कर्मचार्‍यांच्या जमा विमा (Employees’ Deposit Linked Insurance-EDLI) योजनेत जास्तीत जास्त आश्वासन लाभ 7 लाखांपर्यंत वाढविला आहे. EDLI ही योजना अनिवार्यपणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या सर्व ग्राहकांना जीवन विम्यात योगदान देण्यासाठी पुरविली जाते. EDLI विमाधारकाच्या नियुक्त केलेल्या लाभार्थीस नैसर्गिक कारण, आजारपण किंवा अपघात यामुळे मृत्यू झाल्यास एकरकमी रक्कम देण्याची तरतूद करते. EDLI योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यास उत्पन्नाचे संरक्षण देणे हा आहे. हा फायदा कंपनी आणि केंद्र सरकार कर्मचार्‍यांना देत आहे. ही योजना EPF आणि EPS यांच्या संयोजनात कार्य करते. याअंतर्गत, ग्राहकांनी लाभ घेण्यासाठी पात्र होण्यापूर्वी सलग 12 महिने काम करणे आवश्यक नाही. वाचा-मुलीचे भविष्य करा सुरक्षित! या योजनेत 21 वर्षात मिळेल 64 लाखांचा रिटर्न कसा घ्याल या योजनेचा फायदा जर ईपीएफ ग्राहकाचे अकाली निधन झाले तर तर त्याचा नॉमिनी किंवा कायदेशीर वारस विमा संरक्षणासाठी दावा करु शकतात. हक्क सांगणारी व्यक्ती अल्पवयीन असेल तर त्याचे पालक त्याच्या वतीने दावा करु शकतो. वाचा-Jio प्लॅटफॉर्मनंतर एसएलपीची रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटींची गुंतवणूक यासाठी विमा कंपनीला मृत्यू प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र आणि बँकेचा तपशील देणे आवश्यक आहे. जर पीएफ खात्याचे नामनिर्देशित नसेल तर कायदेशीर वारस या रकमेवर दावा करु शकतात. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी मालकाकडे जमा करण्याच्या फॉर्मसह विमा संरक्षणाचे फॉर्म जमा करणे गरजेचे आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Money, Open ppf account

    पुढील बातम्या