• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol price today: IOCL कडून नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल रेट

Petrol price today: IOCL कडून नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल रेट

इंधन दरात कमी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी 15 पैशांची कपात केली होती. त्यानंतर दर स्थिर आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : सरकारी तेल कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल-डिझेलचे (petrol-diesel today) नवे रेट जारी केले आहेत. आज सलग 10 व्या दिवशी किमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. परंतु इंधन दरात कमी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी 15 पैशांची कपात केली होती. त्यानंतर दर स्थिर आहेत. IOCL नुसार, देशाची राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा भाव 101.19 रुपये आणि डिझेलचा भाव 88.62 रुपये प्रति लीटर आहे. सुत्रांनुसार, सर्वसामान्यांना लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीपासून दिलासा मिळू शकतो. त्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल GST मध्ये (Petrol-Diesel under GST) आणण्याचा निर्णय घेऊ शकते. दरम्यान, जीएसटीवरील एक समिती पेट्रोलियम उत्पादनांवर राष्ट्रीय दराखाली कर लावण्याचा विचार करेल. अर्थमंत्री निर्माला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती 17 सप्टेंबर 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलला GST कक्षेत आणण्याच्या प्रस्तावाची तपासणी करेल. पेट्रोल-डिझेल भाव (Petrol Diesel Price on 15 September 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडात पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपुरमध्ये पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळमध्ये पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर

    पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होणार? इंधन GST च्या कक्षेत येण्याची शक्यता

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या जातात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर SMS द्वारे आपल्या शहरात पेट्रोल-डिझेल भाव तपासता येतात.
    Published by:Karishma
    First published: