महाराणी एलिझाबेथसोबत करियरची संधी, काम रोज 7 तास आणि मिळणार 'या' सुविधा

महाराणी एलिझाबेथसोबत करियरची संधी, काम रोज 7 तास आणि मिळणार 'या' सुविधा

तुम्ही इन्स्टाग्रामवर चांगलं फीड बनवू शकताय आणि चांगलं, आकर्षक ट्विट लिहिण्याची कला तुमच्याकडे आहे? तर मग तुम्ही राॅयल कम्युनिकेशनचा एक भाग बनू शकता.

  • Share this:

मुंबई, 22 मे : तुम्ही इन्स्टाग्रामवर चांगलं फीड बनवू शकताय आणि चांगलं, आकर्षक ट्विट लिहिण्याची कला तुमच्याकडे आहे? तर मग तुम्ही राॅयल कम्युनिकेशनचा एक भाग बनू शकता. आपल्या जाॅब लिस्टिंग वेबसाइटवर ब्रिटननं राॅयल फॅमिलीनं एक नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय. त्यावर डिजिटल कम्युनिकेशन आॅफिसर पदासाठी अर्ज मागवलेत.

ब्रिटनच्या शाही परिवाराकडून जाॅब लिस्टिंग वेबसाइटवर जाहिरात दिलीय. त्यानुसार इंग्लडच्या शाही परिवाराला डिजिटल कम्युनिकेशन आॅफिसरची गरज आहे. ही नोकरी कायमस्वरूपी असेल आणि आठवड्यात 40 तासाहून कमी काम करावं लागेल. डिजिटल कम्युनिकेशन आॅफिसरची रूम शानदार बंकिंगहॅम पॅलेसमध्ये असेल.

डॉक्टरांचा हलगर्जीपणा.. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू, बाळही दगावले

33 सुट्ट्या आणि मोफत जेवण

या वेबसाइटप्रमाणे डिजिटल कम्युनिकेशन आॅफिसरला सोमवार ते शुक्रवारपर्यंत प्रत्येक आठवड्यात 37.5 तास काम करावं लागेल. वर्षाला 33 दिवस सुट्ट्या आणि दिवसा जेवण मोफत मिळेल. ही नोकरी बंकिंगहॅम पॅलेसमध्ये असेल. डिजिटल आॅफिसरला महाराणीसाठी काम करावं लागेल. त्यांचं काम हे असेल की महाराणीला सार्वजनिक आणि जागतिक व्यासपीठावर सतत कार्यरत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना राबवाव्या लागतील.

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत करणार प्रवेश

26 लाख रुपये पगार

तुम्हाला शाही कुटुंबासाठी निवडलं गेलं तर दर वर्षाला तुम्हाला 26 लाख रुपयांचं पॅकेज मिळणार.

कसा करणार अर्ज?

इच्छुक उमेदवारांनी theroyalhousehold.tal.net इथे जाऊन आॅनलाइन फाॅर्म भरावा.

लोकसभेच्या निकालाआधी 'या' मतदारसंघात पोटनिवडणुकीची तयारी!

उमेदवाराची योग्यता

या पदांसाठी डिजिटल कम्युनिकेशनची पार्श्वभूमी हवी. वेबसाइट आणि सोशल मीडियावर कंटेंट मॅनेज करण्याचा अनुभव हवा

पदवीपर्यंत शिक्षण हवं आणि वेबसाइट मॅनेज करता आली पाहिजे. अद्यावत डिजिटल तंत्राची माहिती हवी.

अद्यावत डिजिटल कम्युनिकेशन माहीत हवं.

उत्तम लेखनशैली, एडिटोरियल स्किल, फोटोग्राफी, व्हिडिओसोबत डिजिटल कंटेंट डिझाइनची माहिती हवी.

चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करता आलं पाहिजे.

कामात तत्परता आणि जलदपणा हवा.

संवाद कौशल्य हवं. युजर फोकस माहीत हवा. त्याप्रमाणे कंटेंट करता येणं गरजेचं.

SPECIAL REPORT : उत्तर प्रदेशमध्ये 'हाती-सायकल' पडणार कमळावर भारी?

First published: May 22, 2019, 12:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या