सत्ता मोदींचीच, पण शेअर बाजाराला येणार नाहीत 'अच्छे दिन'

सत्ता मोदींचीच, पण शेअर बाजाराला येणार नाहीत 'अच्छे दिन'

बिगबुल राकेश झुनझुनवाला यांनी CNBCला दिलेल्या मुलाखतीत शेअर बाजाराचं निवडणूक निकालानंतरचं भविष्य वर्तवलं.

  • Share this:

मुंबई, 21 मे : बिगबुल राकेश झुनझुनवाला यांनी CNBCला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, एनडीएला लोकसभेत 300 10 एवढ्या जागा मिळतील. निवडणूक निकालाआधीच्या एक्झिट पोलमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल, असं समोर आलं. त्याचा परिणाम असा झाला शेअर बाजारात  सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी गेल्या 10 वर्षातली सर्वोत्तम कामगिरी केली.

या एक्झिट पोलप्रमाणे 304 जागा एनडीएला आणि 118 जागा युपीएला आणि उरलेल्या यांच्या बाहेर असलेल्या इतर पक्षांना मिळतील.

'न्यूज 18' Exit Poll : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा पराभव होणार, काँग्रेसला धक्का?

झुनझुनवाला यांनी सांगितलं की निफ्टीचा बाॅटम 11,000 झालाय. पुढे ते हेही म्हणाले की टाॅप आणि बाॅटम लेव्हलचा तुम्ही अंदाज करू शकत नाही.

निफ्टीनं मोदी सरकार सत्तेवर आल्यावर 2014मध्ये 30 टक्क्यांहून जास्त कामगिरी केली. पण यावेळी वेगळं चित्र दिसेल, असं त्यांचं म्हणणं आहे.

106 कर्णधार तोडू शकले नाहीत 'दादा'चा विक्रम, विराटला संधी!

'2019मध्ये बाजारातून 30 टक्क्यांहून जास्त मिळणार नाही, पण मला वाटतं बाजार चांगला असेल. समजा एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं तर बाॅटम 10,750-11,000 असेल. ' राकेश झुनझुनवाला म्हणाले. ते हेही म्हणाले की मोदींचा दुसरा कार्यकाळ पहिल्यापेक्षा जास्त चांगला असेल.

झुनझुनवाला म्हणाले, ' लोकशाही हा भारताच्या वाढीसाठी मोठा अडथळा आहे. पण तीही गरजेची आहे. भारताची वाढ जागतिक वाढीशी संबंधित नाही. कारण भारताची निर्यात GDPपेक्षा खूप कमी आहे.'

घरकुल घोटाळा: सुरेश जैन, गुलाबराव देवकरांच्या राजकीय भविष्याचा आज फैसला

निवडणुकीशिवाय इतर विषयांवर बोलताना ते म्हणाले, शेअर बाजारातली अनिश्चितता ही इराण आणि अमेरिकेतल्या संघर्षामुळे होतेय. ते हेही म्हणाले की, चीन-अमेरिकेतल्या ट्रेड वाॅरमुळे अगोदरच बाजाराला बरीच मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

VIDEO: आयफेल टॉवरवर चढणारा 'स्पायडर मॅन' ताब्यात

First published: May 21, 2019, 12:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या