Elec-widget

5 वर्षांत इथे मिळणार 1 कोटी नोकऱ्या, जाणून घ्या हा अहवाल

5 वर्षांत इथे मिळणार 1 कोटी नोकऱ्या, जाणून घ्या हा अहवाल

पुढच्या पाच वर्षांत देशात एमएसएमई सेक्टरमध्ये 1 कोटी नोकऱ्यांची संधी मिळणार आहे. जपानच्या नोमुरा रिसर्च इन्स्टिट्युटनं एका अहवालामध्ये हे सांगितलंय.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : पुढच्या पाच वर्षांत देशात एमएसएमई सेक्टरमध्ये 1 कोटी नोकऱ्यांची संधी मिळणार आहे. जपानच्या नोमुरा रिसर्च इन्स्टिट्युटनं एका अहवालामध्ये हे सांगितलंय. या अहवालामध्ये सांगितलंय, परदेशांतून खरेदी करत असलेल्या वस्तूंचं उत्पादन देशातच बनलं, तर अनेक कंपनींना फायदा होईल.

अनेक उत्पादनं बनवण्यासाठी देशभरातच इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता येईल. त्यासाठी पावलं उचलावी लागतील. याच रिपोर्टमध्ये म्हटलंय की, आर्टिफिशल दागिने, खेळाचं सामान, वैज्ञानिक उपकरणं, कपड्याचं मशीन, विजेचा पंखा, रबर, प्लास्टिक, चामडं आणि संबंधित इतर उत्पादनं बनवण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध होणारेय.

नोमुरा रिपोर्टमध्ये नमुद केलंय की, देशाच्या मॅनिफॅक्चरिंग क्षेत्रात दुहेरी जबाबदारी उचलावी लागेल. कृषी क्षेत्रातून येणाऱ्या कामगारांनाही सांभाळावं लागेल. कामगार संघटनांमध्ये सामील होणाऱ्या नव्यांची जबाबदारीही यांच्यावर राहील.

एमएसएमई मंत्रालयाच्या 2017-18च्या अहवालाप्रमाणे मॅनिफॅक्चरिंग क्षेत्रात 3.6 कोटी म्हणजेच 70 टक्के रोजगाराचं योगदान एमएसएमई क्षेत्रातून आहे. देशांमध्ये विविध कारभारात एमएसएमईचा विस्तार झालाय.

अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी वाढल्यात.  ई-काॅमर्स कंपनी पेटिएम माॅल पुढच्या काही दिवसांमध्ये 300 लोकांना नोकरी देणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं 200 जणांना नोकऱ्या दिल्या होत्या. पेटिएम माॅल देशातली सर्वात तेजीत असलेली आॅनलाइनवरून आॅफलाइन ( ओ2ओ) असलेली कंपनी आहे.

Loading...

गेल्या सहा महिन्यांमध्ये ओ2ओचा उद्याग 200 टक्के वाढलाय. पेटिएम माॅलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीनिवास मोथे यांनी सांगितलं, आम्हाला ओ2ओ उद्यागातून प्रचंड फायद्याची अपेक्षा आहे. यासाठीच आम्ही अगोदर काहींना नियुक्त केलंय. अजून कर्मचाऱ्यांची गरज कंपनीला लागणार आहे.


VIDEO : डे विथ लीडरमध्ये राजू शेट्टींसोबत एक दिवस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobsmoney
First Published: Apr 12, 2019 08:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...