दर वर्षी मिळेल 65 हजार रुपयांचं पेन्शन, जाणून घ्या LICच्या या पाॅलिसीबद्दल

दर वर्षी मिळेल 65 हजार रुपयांचं पेन्शन, जाणून घ्या LICच्या या पाॅलिसीबद्दल

हा एक नाॅन लिंक्ड प्लॅन आहे. शिवाय ही एकल प्रीमियम वार्षिक योजना आहे.

  • Share this:

मुंबई, 01 मे : भारतीय जीवन विमा LIC सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी नवनव्या स्किम आणत असते. LICनं काही दिवसांपूर्वी जीवन शांती प्लॅनची सुरुवात केलीय. या पाॅलिसीची खासीयच अशी की यात तुम्हाला पेन्शन मिळतं. समजा 50 वर्षांच्या एका व्यक्तीनं पाॅलिसीत 10, 18, 000 रुपये गुंतवले की त्याला लगेच 65,600 रुपये वार्षिक पेन्शन सुरू होतं. याबरोबर काही अटीही आहेत. LICचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा यांनी सांगितलं, शांती योजना हा एक नाॅन लिंक्ड प्लॅन आहे. शिवाय ही एकल प्रीमियम वार्षिक योजना आहे.

आॅनलाइन आणि आॅफलाइन खरेदी करा पाॅलिसी

ही स्किम आॅनलाइन आणि आॅफलाइनही खरेदी केली जाते. या जीवन शांती योजनेचा फायदा व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबालाही मिळतो.


सर्वसामान्यांना झटका, गॅस सिलेंडरच्या किमतीत झाली 'इतकी' वाढ


पाॅलिसीची खासीयत

हा एक सिंगल प्रीमियम डिपॉझिट पेंशन प्लॅन आहे. त्याची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे-

1. कर्जाची सुविधा

2. तीन महिन्यांनंतर कुठल्याही मेडिकल सर्टिफिकेटशिवाय कधीही सरेंडर करता येते

3. 1 ते 20 वर्षात कधीही पेन्शनला सुरुवात

4. जाॅइंट लाइफ आॅप्शनमध्ये कुठल्याही जवळच्या नातेवाइकाचा समावेश करता येतो

5. ताबडतोब पेन्शन

6. 5 ते 20 वर्षांपर्यंत पेन्शन दर 9. 18 टक्के ते 19.23 टक्के

7. इन्कम टॅक्समध्ये सूट


विद्यापीठातला धक्कादायक प्रकार; मुलींची कपडे उतरवून घेतली झडती

कसे मिळतील पैसे?

50 वर्षांचा व्यक्ती 10,18,000 रुपये पाॅलिसीत गुंतवत असेल तर त्याला लगेच 65600 रुपयांचं वार्षिक पेन्शन मिळेल. पण Deferred आॅप्शनप्रमाणे त्याला खालील रक्कम मिळेल

1 वर्षानंतर - 69300 रुपये वार्षिक

5 वर्षानंतर - 91800 रुपये वार्षिक

10 वर्षानंतर - 128300 रुपये वार्षिक

15 वर्षानंतर - 169500 रुपये वार्षिक

20 वर्षानंतर - 192300 रुपये वार्षिक


Exclusive : आजपासून सुबोधचा 'कड्डक' लाल्या अवतरणार रंगमंचावर


LICच्या जीवन शांती योजनेचा फायदा कोणाला?

ही योजना कमीत कमी 30 वर्ष आणि जास्तीत जास्त 85 वर्षांच्या व्यक्ती घेऊ शकतात. या योजनेत पेन्शन सुरू झाल्यावर एक वर्षानंतर कर्ज घेता येतं आणि पेन्शन सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांनी सरेंडर करता येतं.

ही योजना LICच्या जीवन अक्षयसारखी आहे.


राहुल गांधी लंडनमधील कोणत्या कंपनीचे मालक होते? थेट लंडनमधून EXCLUSIVE REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: LIC
First Published: May 1, 2019 01:41 PM IST

ताज्या बातम्या