News18 Lokmat

LIC मध्ये अधिकारी पदांसाठी 1753 व्हेकन्सीज्, 'असा' करा अर्ज

या व्हेकन्सी Apprentice Development Officer (ADO) पोस्टसाठी आणि महाराष्ट्राच्या झोनल आॅफिससाठी आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 04:56 PM IST

LIC मध्ये अधिकारी पदांसाठी 1753 व्हेकन्सीज्, 'असा' करा अर्ज

मुंबई, 25 मे : LIC Recruitment 2019: लाइफ इन्शुरन्स काॅर्पोरेशन ऑफ इंडियानं 1753 व्हेकन्सी काढल्यात. या व्हेकन्सी Apprentice Development Officer (ADO) पोस्टसाठी आणि महाराष्ट्राच्या झोनल ऑफिससाठी आहे.

10 हजारांची गुंतवणूक, महिन्याला 30 हजाराची कमाई, पटापट जाणून घ्या हा व्यवसाय

LIC ADO अर्जाची प्रक्रिया 20मेपासून सुरू झालीय. ती 9 जून 2019पर्यंत आॅनलाइन आहे. ADO पोस्टसाठी निवड Preliminary ऑनलाइन परीक्षा आणि Main ऑनलाइन परीक्षेच्या आधारे असते. उमेदवार LIC ADO परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड 29 जून 2019पासून डाऊनलोड करू शकतात.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, बदलतंय ट्रेनचं रूप, मिळतील 'या' सुविधा

या पदासाठी एलआयसी बाहेरून आणि त्यांच्याकडे काम करत असलेल्यांमधूनही उमेदवार निवडेल. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी हवी, जी Insurance Institute of India, Mumbai च्या फेलोशिपसाठी चालू शकेल.

Loading...

तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे? मग मिळू शकते सरकारी नोकरी

या व्हेकन्सीची पोस्टिंग्ज देशातल्या वेगवेगळ्या राज्यात होतील. LIC ADO पदावर निवडले गेलेल्या उमेदवारांना महिन्याला 34,503 रुपये पगार मिळेल. ज्या उमेदवारांकडे 2 वर्षांचा अनुभव असेल, त्यांना प्राधान्य दिलं जाईल. 21 ते 30 वयोगटातल्या उमेदवारांनी अर्ज करावा. Preliminary आणि Main व्यतिरिक्त इंटरव्ह्यूच्या आधारे निवड होईल.


SPECIAL REPORT : मृत्यूच्या दारातून लहानग्यांना खेचून आणणाऱ्या 'हिरो'ने सांगितली थरारक कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: LIC
First Published: May 25, 2019 04:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...