फाॅर्म 16 मध्ये केलेत मोठे बदल, नोकरदारांनी हे जाणून घ्या

तज्ज्ञांच्या मते फाॅर्म 16 आणि 24 क्यू यात बराच बदल केलाय.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 03:14 PM IST

फाॅर्म 16 मध्ये केलेत मोठे बदल, नोकरदारांनी हे जाणून घ्या

मुंबई, 17 एप्रिल : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं फाॅर्म 16मध्ये खूप बदल केलेत. टॅक्स डिपार्टमेंटनं आणलेला फाॅर्म 16 हा 12 मे 2019पासून वापरता येईल. याचा अर्थ 2018-19 या आर्थिक वर्षात आयकर रिटर्न या नव्या फाॅर्म 16प्रमाणे भरला जाईल. तज्ज्ञांच्या मते फाॅर्म 16 आणि 24 क्यू यात बराच बदल केलाय. ते जास्त व्यापक बनवलेत. फाॅर्म 16मध्ये घरामुळे मिळणारी मिळकत आणि कंपनींच्या इतर अलाऊंसचाही समावेश आहे. इन्कम टॅक्स चोरीवर अंकुश लावण्यासाठी हे केलं गेलंय. आयकर रिटर्न ITR भरण्यासाठी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना फाॅर्म 16 देतं.

हा बदल कशासाठी? - एण्डरसन ग्लोबलचे संचालक एस. महेश्वरीनं सांगितलं की फाॅर्म 16 आणि 24 क्यू अशा प्रकारे बनवण्याचं कारण असं की ते जास्त व्यापक आणि सूचना देणारं आहे.

काय असतो फाॅर्म 16 - यात कर्मचाऱ्याच्या टीडीएसची माहिती असते. हा फाॅर्म जूनमध्ये दिला जातो. याचा उपयोग इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी होतो.

12मेपासून होणार लागू- इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं दिलेला हा फाॅर्म 12 मे 2019 पासून लागू होईल. 2018-19चं इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फाॅर्म 16चा उपयोग असतो.

फाॅर्म 16मध्ये बचत खात्यांत जमा व्याजाचा संदर्भही आहे.

Loading...

आयकर खात्यानं अगोदरच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास सूचित केलंय.

फाॅर्म 24 क्यूमध्येही बदल

नोकरदार जे आपल्या खात्याचं आॅडिट करत नाहीत, त्यांना 31 जुलैपर्यंत आयटीआर भरावा लागेल.

आयकर विभागानं फाॅर्म 24 क्यूमध्येही बदल केलाय.

हा फाॅर्म कंपनी भरून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देतात.


निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी असं वापरलं जातीचं कार्ड पाहा UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2019 03:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...