10वी पास असलेल्यांना ड्रायव्हरची संधी, 'या' उमेदवारांची होईल निवड

10वी पास असलेल्यांना ड्रायव्हरची संधी, 'या' उमेदवारांची होईल निवड

UPSC, Driver Job - युनियन पब्लिक सर्विस कमिशन ( UPSC ) म्हणजेच संघ लोक सेवा आयोगामध्ये नोकरीची संधी आहे

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : युनियन पब्लिक सर्विस कमिशन ( UPSC ) म्हणजेच संघ लोक सेवा आयोगामध्ये नोकरीची संधी आहे. इथे ड्रायव्हरच्या पदासाठी व्हेकन्सी आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार UPSC ची आॅफिशियल वेबसाइट upsc.gov.in यावर 1 जुलै 2019च्या आधी अर्ज करा. UPSC च्या ड्रायव्हर पदासाठीची अधिक माहिती पुढीलप्रमाणे-

महत्त्वाची तारीख

ड्रायव्हर म्हणून अर्ज करायचा असेल तर शेवटची तारीख आहे 11 जुलै 2019. तुम्ही आतापासून कधीही अर्ज करू शकता. शेवटची तारीख उजाडेपर्यंत वाट पाहू नका.

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, 'असा' होईल फायदा

ड्रायव्हर पदासाठी जरुरी पात्रता

मोटार कार्सचं वैध ड्रायव्हिंग लायसन्स हवं.

मोटार मेकॅनिकची माहिती हवी. उमेदवाराला गाडीची थोडीफार दुरुस्ती करता आली पाहिजे

घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय आणि वर्षाला कमवा लाखो रुपये

कमीत कमी 3 वर्ष गाडी चालवण्याचा अनुभव हवा

उमेदवार दहावी उत्तीर्ण हवा

UPSC पास न होता देखील केंद्रात सरकारी अधिकारी होता येणार

ड्रायव्हर्ससाठी 2 व्हेकन्सीज आहेत. ही भरती शाॅर्ट टर्म काॅन्ट्रॅक्टवर होईल. हा अवधी सहा महिन्यांचा आहे. सुरुवातीचा पगार 19 हजार रुपये दर महिन्याला आहे. या पदासाठी 62 वर्षांपेक्षा जास्त वयाचे उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.

दरम्यान, मोदी सरकार ड्रायव्हिंग लायसन्स ( डीएल ) तयार करण्याचे नियम सोपे बनवण्यावर काम करतंय. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत समान ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी)च्या नव्या नियमांची माहिती दिली. 1 ऑक्टोबर 2019 पासून पूर्ण देशात ड्रायव्हिंग लायसन्स (DL ) आणि वाहनांचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) एकच असेल. आता सगळ्या राज्यांच्या DL आणि RCचा रंग एकच असेल आणि त्यातली माहिती एकाच जागी असेल.

आतापर्यंत प्रत्येक राज्य आपल्या सोयीनुसार DL आणि RCचा फाॅर्मेट तयार करतं. त्यामुळे काही राज्यांच्या डीएलवर माहिती पुढच्या बाजूला तर काही राज्यांच्या डीएलवर मागच्या बाजूला असते. पण आता असं असणार नाही. सर्व राज्यांसाठी ते समान असेल.

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: upsc
First Published: Jul 6, 2019 02:23 PM IST

ताज्या बातम्या