S M L

ट्रेनीपासून सुरुवात करून उभा केला 3 लाख कोटींचा उद्योग; देशातला हा बडा उद्योजक पडद्याआड

आयटीसीचे माजी अध्यक्ष आणि सीईओ वाय. सी. देवेश्वर यांचं आज ( 11 मे ) निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. अनेक वर्ष ते आजारी होते.

News18 Lokmat | Updated On: May 11, 2019 04:17 PM IST

ट्रेनीपासून सुरुवात करून उभा  केला 3 लाख कोटींचा उद्योग; देशातला हा बडा उद्योजक पडद्याआड

मुंबई, 11 मे : आयटीसीचे माजी अध्यक्ष आणि सीईओ वाय. सी. देवेश्वर यांचं आज ( 11 मे )  निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. अनेक वर्ष ते आजारी होते. देवेश्वर यांना 1996मध्ये आयटीसीच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं होतं. तेव्हापासून इतकी वर्ष चेअरमन पदी राहणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत. आयटीसीचं नाव घराघरात पोचलंय. फूड, पर्सनल केअर, ब्रँडेड अपॅरल, सिगरेट, हाॅटेल, कृषी उद्योग, आयटी सर्वच क्षेत्रात आयटीसी कंपनी आहे. 24 आॅगस्ट 1910मध्ये तंबाखू कंपनी सुरू होऊन आज ती देशातली सर्वात मोठी कंपनी आहे.

देवेश्वर यांनी कंपनी 10 पट मोठी केली

आधार अपडेट करायचे दर बदललेत, जाणून घ्या किती पडतील पैसे


कंपनीची परिस्थिती खराब असताना देवेश्वर यांनी घेतली जबाबदारी - योगेश्वर चंद्र देवेश्वर जेव्हा या कंपनीत आले तेव्हा कंपनीची आर्थिक परिस्थिती वाईट होती. आपल्या चार दशकांच्या कार्यकाळात त्यांनी आयटीसीच्या उत्पादनांचा अनेक क्षेत्रात विस्तार केला. देवेश्वर यांनी कंपनीची जबाबदारी घेतली तेव्हा कंपनीचं खूप आर्थिक नुकसानही झालं होतं.

लाहोरला जन्म - योगेश चंद्र देवेश्वर यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1947 रोजी लाहोरमध्ये झाला. त्यांनी 1968मध्ये दिल्लीहून इंडियन इन्स्टिट्युट आॅफ टेक्नाॅलाॅजीमध्ये बी.टेकची पदवी घेतली. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि अमेरिकेच्या काॅनेल विश्वविद्यालयातून उच्च शिक्षण घेतलं.

'या' म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं आहे धोकादायक,अशी घ्यावी काळजी

Loading...

वाय.सी. देवेश्वर यांनी दिल्लीच्या आयआयटीमध्येही शिक्षण घेतलं होतं. 1968मध्ये ते कंपनीत आले आणि 1984मध्ये त्यांना आयटीसीचं संचालक केलं. त्यानंतर ते 1996मध्ये आयटीसीचे सीईओ आणि अध्यक्ष झाले. जुलै 2011मध्ये त्यांना 5 वर्षांसाठी अध्यक्ष करायची घोषणा केली. 2017मध्ये त्यांनी पद सोडलं.

असं उभारलं कोट्यवधींचं एम्पायर

देवेश्वर यांनी 2000 मध्ये ई चौपाल सुरू केला. यामुळे कंपनी शेतकऱ्यापर्यंत पोचली आणि कंपनीला आपली उत्पादनं बनवण्यासाठी स्वस्तात कंपनीला कच्चा माल मिळायला लागला. या माॅडेलचा अंतर्भाव हार्वर्ड बिझनेस स्कुलनं आपल्या अभ्यासक्रमातही केला. 2001मध्ये कंपनीनं सन फीस्ट बिस्किटं लाँच केली.


5 हजार रुपये गुंतवून कमवा 49 लाख, 'अशी' करा सुरुवात

कंपनीनं 2002 मध्ये लाइफस्टाइल आणि प्रीमियम नोटबुक हा कारभार सुरू केला.

2007मध्ये कंपनीनं बिंगो सॅनेक्स लाँच करून फूड मार्केटमध्ये मोठा शेअर मिळवला.

डायव्हर्सिफिकेशन आयडियावर काम करण्यासाठी 55 लोकांची रिसर्च आणि डेव्हलपमेंटची टीम तयार केली. त्यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला.

आयटीसी लिमिटेड अख्ख्या भारतभर पसरलं.

फूड, पर्सनल केअर, ब्रँडेड अपॅरल, सिगरेट, हाॅटेल, कृषी उद्योग, आयटी सर्वच क्षेत्रात आयटीसी कंपनी आहे.

आयटीसीची कमाई 10 पट वाढली - देवेश्वर यांच्या काळात आयटीसी 5200 कोटींहून 51500 कोटींपर्यंत पोचली. कंपनीचा नफा 33 पट वाढला. नफा 452 कोटी रुपयांवरून 14958 कोटी रुपये झाला. पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला होता.


VIDEO: नाशिकमध्ये लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्याक्षिकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2019 04:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close