आता रेल्वे TT सीट नाकारू शकत नाही, मोठा झालाय बदल

आता रेल्वे TT सीट नाकारू शकत नाही, मोठा झालाय बदल

भारतीय रेल्वेनं प्रवाशांसाठी महत्त्वाची पावलं उचललीयत. जाणून घ्या ट्रेनमध्ये कुठल्या सीट्स रिकाम्या आहेत हे कसं पाहायचं

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : भारतीय रेल्वेनं प्रवाशांसाठी महत्त्वाची पावलं उचललीयत. IRCTCनं दिलेल्या माहितीनुसार आता तुम्ही रिझर्वेशन चार्ट आॅनलाइन पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला कळेल की ट्रेनमध्ये जागा शिल्लक आहे हे तुम्हाला आधीच कळू शकतं. तुम्ही IRCTच्या वेबसाइटवर कुठल्याही ट्रेनचा रिझर्व्हेशन चार्ट पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला रेल्वे TT कडे जाऊन विनंती करायची गरज नाही.

रिझर्वेशन चार्ट तपासू शकता - ट्रेनमध्ये चार्ट तयार झाला की रेल्वे IRCTCच्या वेबसाइटवर तो अपलोड करते. आता ट्रेन सुटण्याच्या 4 तास आधी तुम्हाला साइटवर तो चार्ट दिसू शकतो. दुसरा चार्ट ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटं आधी दिसू शकतो. दुसऱ्या चार्टमध्ये पहिल्या चार्टमधल्या रिकाम्या सीट्सची माहिती मिळते.

रिकामी सीट्स मिळू शकेल - चार्टमध्ये रिकामी सीट पाहून ती देण्यासाठी तुम्ही TT ला सांगू शकता. नवा चार्ट तुम्ही मोबाईलवरही पाहू शकता. तो डेस्कटाॅपवरही दिसेल. सीट पाहण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या वेबसाइटवर लाॅगइन करावं लागणारं नाही. कुणीही हा चार्ट पाहू शकतो.

अशी चेक करा सीट

रिझर्व्हेशन चार्ट पाहण्यासाठी तुम्हाला www.irctc.co.in साइटवर जावं लागेल.

या वेबसाइटवर बुक विंडोच्या खाली  PNR स्टेट्सच्या शेजारी व्हेकन्सीचा पर्याय मिळेल.

यावर क्लिक करा, मग नवा विंडो येईल.

यात तुम्हाला प्रवासाबद्दल माहिती मिळेल.

यात तुम्हाला ट्रेनचं नाव, नंबर, प्रवाशाची तारीख आणि बोर्डिंग स्टेशनची माहिती असते. मग तुम्हाला गेट ट्रेन चार्टवर क्लिक करावं लागेल.

यावर क्लिक केल्यावर समोर एक विंडो उघडेल.

या विंडोत सीटची श्रेणी होईल. म्हणजे स्लीपर, सेकंड सीटिंग, थर्ड एसी, सेकंड एसी. तुम्हाला ज्या क्लासमध्ये प्रवास करायचाय त्यावर क्लिक करावं लागेल.

कुठल्या स्टेशनपासून कुठल्या स्टेशनपर्यंत बर्थ मोकळा आहे हे समोर येईल.

शिवाय कुठल्या कोचमध्ये कुठला बर्थ रिकामा आहे, हेही कळेल.

विंडोच्या खाली श्येड्युल येईल. त्यावर क्लिक करा. ट्रेनचं पूर्ण श्येड्युल समोर येईल. त्यामुळे ट्रेन उशिरा आहे का हेही कळेल.

तुम्हाला हेही कळेल की कुठल्या स्टेशनवर सीट रिकामी मिळेल.

VIDEO : राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर मेटेंविरोधात पंकजा आक्रमक, शायरीतून साधला निशाणा

First published: April 13, 2019, 12:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या