Home /News /money /

GST मुळे आता रोजच्या अन्नातील पदार्थही होणार महाग! 'या' वस्तूंवर वाढला कर

GST मुळे आता रोजच्या अन्नातील पदार्थही होणार महाग! 'या' वस्तूंवर वाढला कर

ज्या हॉटेलचे दैनंदिन भाडे रु. 1000 पेक्षा कमी आहे त्यांना 12 टक्के कर लागेल. सध्या 1000 रुपयांपेक्षा कमी भाड्याच्या हॉटेल खोल्यांना करातून सूट देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 29 जून : महागाईमुळे (Inflation) आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना लवकरच अजून एक झटका बसणार आहे. आता नॉन ब्रँडेड तांदूळ (Non Branded Rice) आणि पिठावरही (Atta) टॅक्स अर्थात कर (Tax) लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही वस्तूंच्या दरात वाढ होणार आहे. आतापर्यंत केवळ ब्रँडेड तांदूळ आणि पिठावर जीएसटी (GST) आकारला जात होतात. परंतु, राज्यांचा महसूल (Revenue) वाढावा यासाठी नॉन ब्रँडेड तांदूळ, पिठासह अन्य काही गोष्टी जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या (GST Council) 47व्या बैठकीचं चंडीगड (Chandigarh) येथे आयोजन करण्यात आलं होतं. या दोन दिवसीय बैठकीचा आज (29 जून) अखेरचा दिवस होता. मंगळवारी (28 जून) ही बैठक सुरू झाली होती. या बैठकीत अनेक वस्तूंवरच्या करदरांमध्ये बदल करण्याचा आणि काही वस्तूंवरची करसवलत संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला गेला. सोनं आणि मौल्यवान धातूंवरच्या कराचे दर तर्कसंगत करण्यासाठी मंत्र्यांच्या तीन समित्यांच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. आज झालेल्या बैठकीत राज्यांच्या जीएसटी भरपाईचा (GST Compensation) कालावधी वाढवण्याच्या मुद्द्यावर निर्णय होऊ शकतो. राज्यांना जीएसटी भरपाई देण्याचा कालावधी 30 जून रोजी संपत आहे. 1 जुलै 2017 रोजी जीएसटी प्रणाली लागू झाली. राज्यांच्या महसुलातील कमतरता जीएसटीच्या माध्यमातून भरून काढली जाईल, असं त्या वेळी केंद्र सरकारने म्हटलं होतं. यालाच जीएसटी भरपाई म्हणतात; मात्र ही गोष्ट केवळ पाच वर्षांसाठी होती. `जीएसटी भरपाई संपल्याने महसुलावर मोठा परिणाम होईल,` असं राज्यांचं म्हणणं आहे. `कोरोना महामारीमुळे राज्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. त्यातच जीएसटी भरपाई बंद झाल्याने आमच्यावरचा दबाव आणखी वाढेल,` असं राज्यांनी म्हटलं आहे. अजून पाच वर्ष जीएसटी भरपाई मिळावी, अशी मागणी राज्यांनी केली आहे. व्यावसायिकांना फटका! नवीन कमर्शियल सिलेंडर कनेक्शन महागलं मंगळवारी जीएसटी परिषदेच्या बैठकीत करदरांबाबत `हे` निर्णय घेण्यात आले आता मीट (Meat) अर्थात मांस, मासे, दही, पनीर आणि मधासारख्या प्री-पॅक्ड (Pre -packed) आणि लेबल्ड पदार्थांवर (फ्रोजन वगळून) पाच टक्के कर लागू होईल. पीठ आणि तांदळासारख्या नॉन-ब्रॅंडेड वस्तूंवर, तसंच त्या जर प्री-पॅकेज्ड आणि लेबल्ड (Labeled) असतील, तर या वस्तूंवर पाच टक्के कर लागू होईल. आतापर्यंत केवळ ब्रॅंडेड तांदूळ आणि पिठावर जीएसटी लागू होता. बँकेचा धनादेश (Cheque) जारी करण्यासाठी जे शुल्क वसूल केलं जातं, त्यावर आता कर लागू असेल. शेंगायुक्त भाजीपाला, सुका मखाणा, गहू आणि इतर तृणधान्य, गहू किंवा सातूचं पीठ, गूळ, पफ्ड तांदूळ, सर्व प्रकारच्या सेंद्रिय वस्तू आणि खतं, काथ्यावर 5 टक्के कर लागेल. प्रिंटिंग, लिहिण्याची, तसंच रेखांकनाची शाई, विशिष्ट प्रकारचे चाकू, चमचा, टेबलावरचं साहित्य, डेअरी मशिनरी, एलईडी लाईट, ड्रॉइंग साहित्यावरचा जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. तसंच सौर ऊर्जेवरचे वॉटर हीटर आणि फिनिश्ड लेदरवरचा जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हॉटेलच्या एका रूमचं (Hotel Room) रोजचं भाडं 1000 रुपयांपेक्षा कमी असेल, तरी त्यावर 12 टक्के कर लागू होईल. आतापर्यंत 1000 रुपयांपेक्षा कमी भाडं असलेल्या हॉटेलच्या रूम्ससाठी करातून सूट देण्यात आली होती.
    First published:

    Tags: GST, Inflation

    पुढील बातम्या