मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एप्रिल 2021 पासून घटणार तुमच्या हातात येणारा पगार, वाचा काय आहे फायदा आणि नुकसान?

एप्रिल 2021 पासून घटणार तुमच्या हातात येणारा पगार, वाचा काय आहे फायदा आणि नुकसान?

गेल्यावर्षी केंद्र सरकारने दोन्ही सभागृहांमध्ये वेजेस कोड, 2019 (Wages Code, 2019) संमत केला होता. दरम्यान एप्रिल 2019 पासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी केंद्र सरकारने दोन्ही सभागृहांमध्ये वेजेस कोड, 2019 (Wages Code, 2019) संमत केला होता. दरम्यान एप्रिल 2019 पासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी केंद्र सरकारने दोन्ही सभागृहांमध्ये वेजेस कोड, 2019 (Wages Code, 2019) संमत केला होता. दरम्यान एप्रिल 2019 पासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 10 डिसेंबर: पुढील वर्षी 2021 मध्ये नोकरदारांच्या हातामध्ये येणारा पगार कमी होऊ शकतो. केंद्र सरकारच्या न्यू वेज कोड अंतर्गत कंपन्यां पे पॅकेज (Pay Package) रिस्ट्रक्चर करतील. अशी शक्यता आहे की, एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा पगार, पीएफ आणि ग्रॅच्यूटीच्या नियमात बदल होईल. सरकार नवीन Compensation नियम  (New Compensation Rule) लागू करण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये बदलाव पाहायला मिळेल. हे नियम गेल्यावर्षी संसदेत पारित झालेल्या वेज कोडचा भाग आहेत. पुढील फायनान्शिअल वर्षामध्ये पगाराची नवीन परिभाषा सुरू होणार आहे. या नवीन नियमात अलाउन्सची मर्यादा निश्चित आहे. हा एकूण सॅलरीच्या 50 टक्क्यापेक्षा जास्त नसेल.

नवीन नियमांनुसार कंपन्यांच्या अधिकतर पे स्ट्रक्चकमध्ये बदल पाहायला मिळेल. कंपनी आणि कर्मचारी दोघांच्या पीएफ कॉन्ट्रिब्यूशनमध्ये वाढ होईल. हे योगदान वाढल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-सामान्यांना काहीसा दिलासा! जाणून घ्या काय आहेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर)

हे विधेयक गेल्यावर्षी संसदेत पारित करण्यात आलं होतं. कोरोना व्हायरसच्या संकटकाळात कंपन्यांवर याचा  परिणाम पाहायला मिळेल. पब्लिक फीडबॅक मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडून याबाबत नोटिफाय केले जाईल.

जाणून घ्या या नियमातील महत्त्वाचे मुद्दे

1. या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांची सॅलरी स्लीप, प्रोव्हिंडंट फंड, ग्रॅच्यूटी, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार यामध्ये देखील बदल होईल.

ग्रॅच्यूइटीची आणि पीएफची रक्कम वाढेल.

2. हा नवीन नियम लागू झाल्यानंतर अधिकतर कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पे स्ट्रक्चरमध्ये बदल होईल. साधारणपणे या कंपन्यामध्ये नॉन अलाउंस हिस्सा कमी असतो. काहींमध्ये हा हिस्सा 50 टक्क्यांपेक्षाही कमी असतो.

(हे वाचा-या नोकरदारांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता खात्यामध्ये येणार जास्त पगार)

3. कर्मचारी आणि नियोक्ता यांचे पीएफ योगदान वाढेल

4. पीएफमध्ये योगदान वाढल्यामुळे टेक होम सॅलरी कमी होईल

5. या नियमामुळे फायदा असा होईल की जरी तुमच्या हातात येणारा पगार कमी होणार असला तरी रिटायमेंट फंड  (Retirement Fund) वाढेल.

6. कंपन्यांच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते, कारण त्यांचे पीएफ आणि ग्रॅच्युटी योगदान वाढणार आहे.

First published:

Tags: Money, Pf, Pf news