या व्यवसायात गुंतवा 2 लाख रुपये, दर महिन्याला मिळतील 50 हजार

कुठलाही नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात.एक म्हणजे व्यवसायात किती गुंतवणूक करायची. दुसरं म्हणजे या व्यवसायात किती फायदा होणार.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 12:20 PM IST

या व्यवसायात गुंतवा 2 लाख रुपये, दर महिन्याला मिळतील 50 हजार

मुंबई, 15 एप्रिल : कुठलाही नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात.एक म्हणजे व्यवसायात किती गुंतवणूक करायची. दुसरं म्हणजे या व्यवसायात किती फायदा होणार. आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाची माहिती देतोय, ज्यात गुंतवणूक एकदम कमी आणि फायदा जास्त आहे. हा व्यवसाय टोमॅटो साॅसचा आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. या कामासाठी केंद्र सरकारचीही तुम्हाला मदत मिळू शकते. सरकारनं वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्टही तयार केलाय. आता आम्ही तुम्हाला सांगतोय की 2 लाख रुपये गुंतवून तुम्ही महिन्याला 50 हजार रुपये कसे मिळवू शकता.

सुरू करा टोमॅटो साॅसचा व्यवसाय : टोमॅटो साॅस किंवा टोमॅटो कॅचअपची मागणी घरात तर असतेच, पण हाॅटेल, रेस्टाॅरंटमध्येही जास्त असते. हल्ली बाजारात लोकप्रिय ब्रँडसोबत लोकल ब्रँड आहेत. लोकल ब्रँडचा क्विलिटी चांगली असेल तर त्याचीही मागणी वाढते. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करणं ही चांगली गोष्ट आहे.

होणारा खर्च : 7.82 लाख रुपये. त्यात भांडवल 2 लाख रुपये ( यात मशीन्सवर होणारा खर्च आहे ). वर्किंग कॅपिटल 5.82 लाख रुपये ( यात टोमॅटो, कच्चा माल, साॅससाठी लागणारे पदार्थ, काम करणाऱ्यांचा पगार, पॅकिंग, टेलिफोन, भाडं हे खर्च येतात ).

सरकारकडून अशी मिळेल मदत : तुम्हाला 1.95 लाख रुपये गुंतवावे लागतील. टर्म लोन 1.50 लाख रुपये मिळेल. वर्किंग कॅपिटल लोन 4.36 लाख रुपये असेल. हे लोन मुद्रा योजनेमधून कुठल्याही बँकेकडून सहज उपलब्ध होईल.

कसा होईल फायदा?: 7.82 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर वर्षाला 28.80 लाख रुपये आर्थिक उलाढाल होऊ शकते. कास्ट आॅफ प्राॅडक्शन : 24.22 वर्षाला लाख रुपये, एकूण नफा : 4.58 लाख रुपये प्रति वर्षी, दर महिन्याचा नफा : जवळजवळ 40 हजार रुपये.

Loading...

कसं मिळेल कर्ज : मुद्रा योजनेप्रमाणे तुम्हाला सरकारी बँकेत अर्ज द्यावा लागेल. तुम्हाला आधार, पॅन नंबर, तुमच्या घराची कागदपत्रं बँकेला द्यावी लागतील. बँक मॅनेजर व्हेरिफिकेशननंतर कर्ज मंजूर करतं.

कसा करायचा अर्ज : तुम्ही कुठल्याही सरकारी बँकेत अर्झ करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक फाॅर्म भरावा लागेल. त्यात डिटेल्स द्यावे लागतील. नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, तुमची कमाई आणि किती कर्ज हवं हे सर्व द्यावं लागेल. यात प्रोसेसिंग फीज किंवा गॅरेंटी फीची गरज नाही.


VIDEO: आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही, अजरामर सुरेश भट


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 12:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...