मोदी सरकारकडून सुवर्णसंधी, 50 हजार रुपयांत सुरू करा व्यवसाय

मोदी सरकारकडून सुवर्णसंधी, 50 हजार रुपयांत सुरू करा व्यवसाय

राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी 15 डिसेंबरपासून फास्टॅग अनिवर्य करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 02 नोव्हेंबर: परिवहन राष्ट्रीय राजमार्ग मंत्रालयाकडून(Ministry of Road, Transport and Highways) देशभरात राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांसाठी टोल प्लाजावर एक विशेष नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 डिसेंबर 2019 पासून टोला नाक्यावरून जाणाऱ्या गाड्यांना FASTagचा वापर करून टोल भरणं अनिवार्य होणार आहे.

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. टोल नाक्यावर गाड्यांची वाढत्या रांगा आणि प्रदूषण दोन्हींवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयात तुम्हीही सामील होऊ शकता. सरकारच्या या निर्णयामुळे तुम्हाला 50 हजार रुपये खर्च करून लाखो रुपये कमवण्याची संधी समोर आली आहे.

वाचा-Jio, Vodafone-Idea, Airtel चा ग्राहकांना दणका, जाणून घ्या रिचार्ज किती महागले

जाणून घ्या व्यवसाय सरू करण्यासाठी नेमकी काय आहे संधी-

देशभरात महामार्गावर चालणाऱ्या चारचाकी आणि त्यापेक्षा अधिक चाक असणाऱ्या गाड्यांना फास्टॅग लावणं अनिवार्य आहे. अशा वाहनांना तुम्ही 15 डिसेंबरआधी फास्टॅग विकू शकता.

एक लॅपटॉप आणि प्रिंटर असेल तर सोपं होईल तुमचं काम

फास्टॅगसाठी पॉइंट ऑफ सेल एजंट होण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या लक्षात ठेवणं आवश्यक आहेत. कंप्युटर आणि त्यातील काही बेसिक गोष्टींची माहिती आवश्यक आहे. एक लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, प्रिंटर आणि बायोमॅट्रिक डिवाइस असणं आवश्यक आहे. आरटीओ एजंट, कार डीलर, कार डेकोर, ट्रांसपोटर्स, पीयूस सेंटर, फ्युलिंग स्टेशन, इन्श्युरन्स एजंट पॉइंट ऑफ सेल एजंट असे अनुभव असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. या व्यवसायातून तुम्हाला साधारण 50 लाख रुपये कमवण्याची संधी मिळू शकते.

वाचा-48 MP कॅमेरा असणारा फोन लवकरच लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

काय आहे फास्टॅग आणि कसं काय करतं?

फास्टॅग एक इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा आहे. राष्ट्रीय महामार्गावर ही फास्टॅग सुविधा उभी केली जाणार आहे. रेडिया फ्रिक्वेंसी आइडेन्टिफिकेशन प्रिंसिपलवर ही यंत्रणा काम करते. फास्टॅगला वाहनांच्या विंडस्क्रिनवर लावण्यात येतं. टोलप्लाझावर असलेल्या सेंसरद्वारे त्याला स्कॅन केलं जातं. स्कॅन केल्यानंतर टोल कापला जातो. त्यामुळे टोल नाक्यावर गाड्यांना थांबून राहावं लागत नाही. या यंत्रणेमुळे ट्राफीक आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवणं सोपं होतं. एकदा लावलेला फास्टॅग हा 5 वर्षांपर्यंतच वैध धरला जातो.

अधिक माहितीसाठी https://nict.ind.in/index.html या वेबसाईटवर भेट देऊ शकता.

------------------------------------------------------------------------------------------------------------

First published: December 2, 2019, 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading