नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : तुम्हाला नवा बिझनेस सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बिझनेस सुरू करण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी सरकारने एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवी कंपनी बनवायची असेल तर सरकारने स्पाइस + फॉर्म सादर केलाय. हा एकत्रित वेब फॉर्म आहे. यामुळे बिझनेस सुरू करण्यासाठी लागणारा वेळ आणि साधनांमध्ये बचत होईल.
2 भागांचा फॉर्म
कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या फॉर्मचे दोन भाग असतील. पहिल्या भागात नव्या कंपन्यांचं नाव संरक्षित करता येईल आणि दुसऱ्या भागात कंपनी स्थापन झाल्यानंतर दिल्या जाणाऱ्या सेवांशी जोडलेला असेल.
(हेही वाचा : 50 % बंपर सूट : परदेशी जाण्याचा प्लॅन असेल तर इथे बुक करा तिकीट)
नव्या कंपनीसाठी या गोष्टी गरजेच्या
नवी कंपनी सुरू करण्यासाठी EPFO आणि ESIC ची सुविधा देणं गरजेचं असतं. त्यामुळे स्पाइस + च्या मार्फत सुरू केलेल्या कंपन्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (EPFO)आणि कर्मचारी राज्य विमा प्राधिकरण (ESIC)ची नोंदणी करणं आवश्यक आहे.
नव्या वेब फॉर्ममुळे पद्धत सोपी
महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या सगळ्या नव्या कंपन्यांसाठी व्यवसाय कराची नोंदणी सक्तीची असेल. ऑनस्क्रीन फायलिंग आणि वास्तविक आकडेवारी देऊन ही प्रक्रिया सोपी केली जाईल. मोदी सरकारने स्टार्टअप, मुद्रा योजनांच्या माध्यमातून तरुणांना नवे बिझनेस सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे.आता या नव्या फॉर्ममुळे व्यवसायासाठी नोंदणी करणं सुकर होणार आहे.
(हेही वाचा : SBI च्या ग्राहकांना मोठा झटका, 'या' सेवेसाठी मोजावी लागणार जास्त रक्कम)
==============================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Modi sarkar, Money