10 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय आणि कमवा महिना 30 हजारांचा नफा

10 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय आणि कमवा महिना 30 हजारांचा नफा

घरातून करा व्यवसायाची सुरुवात आणि वर्षाला मिळवा लाखोंचा नफा.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर: तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. केवळ 10 हजार रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय करून महिन्याला 30 हजार रुपये कमवू शकता. हा व्यवसाय वर्षाचे 12 महिने तुम्ही करू शकता त्यामुळे कोणताही ताण घेण्याची चिन्हं नाहीत. बर हा व्यवसाय असा आहे जो वर्षानुवर्ष चालत राहणार आहे आणि फायदा देणार आहे. नेमका कोणता व्यवसाय आणि कसा करायचा पाहा.

लोणचं हा जेवणाच्या थाळीतील महत्त्वाचा भाग आहे. एक छोटा चमचा लोणचं किंवा लोणच्याची एक फोड प्रत्येकाच्या पानात वाढली जाते. चवनी खाल्ल जणाऱ्या या लोणचाचा व्यवसाय तुम्ही करू शकता. बर वर्षाचे बराही महिने लोणचं खाल्ल जातं त्यामुळे हा व्यवसाय कायम चालू राहणारा आहे. लोणचं तयार करून विकण्याचा हा व्यवसाय तुम्हाला महिन्याला साधारण 30 हजारांपर्यंत चांगली कमाई करून देऊ शकतो. तसं पाहायला गेलं तर 10 हजार रुपयांचा खर्च निघूनही तुम्हाला 20 हजारांचा नफा होत असल्यानं हा व्यवसाय करण्याचा विचार तुम्ही करू शकता. हा व्यवसाय करण्याआधी काय गोष्टींची काळजी घ्य़ाल? कसा असेल खर्च आणि नफ्या तोट्याची गणित काय असतील जाणून घ्या.

वाचा-मोदी सरकार वाढवणार GST चे दर, या वस्तू होणार महाग

10 हजार रुपयांमध्ये सुरु करा व्यवसाय

तुम्ही लोणचं तयार करण्याचा व्यवसाय जर घरीच सुरू केला तर केवळ 10 हजार रुपयांमध्ये हा व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता. या व्यवसायातून तुम्हाला 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत नफा कमवू शकता. वस्तूची मागणी, पॅकिंग, जागा, आणि खप यावर नफ्याची गणितं बदलतात. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन लोणचं विकू शकता.

मार्केटचा अभ्यास करणं आवश्यक

बाजारात सध्या लोणच्याचे कोणते ब्रँड आहेत. त्यांचं पॅकिंग कसं आहे. याचा थोडा अभ्यास करणं आवश्यक आहे. यासोबतच बाजारातील प्रोडक्टपेक्षा आपलं वेगळं कसं होईल यावर भर देणं जास्त गरजेचं आहे. यासाठी लोणच्याची क्वालिटी, पॅकिंग आणि शक्य असेल तर विविधता राखणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्याकडे पर्याय उपलब्ध होतात. सुरुवातीला हवं तर कमी प्रमाणात उत्पादन करून त्याचा फिड बॅक घेणं आवश्यक आहे.पॅकिंग आणि लोणचं जास्त काळ टिकेल यावर विशेष भर देणं आवश्यक आहे. यासोबतच त्यात असणारे विविधता काय आहे याचं मार्केटींग करणं आवश्यक आहे. सोशल मीडियावरून ऑनलाइन विक्रीही सुरु करू शकता.

वाचा-रोज 3 रुपये खर्च करा आणि तुमचं बँक अकाउंट फ्रॉडपासून वाचवा

यासाठी लागणारं साहित्य आणि पॅकिंगसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांसाठी योग्य जागा असणं गरजेचं आहे. कच्चा मला घेऊन त्यापासून तुम्ही व्यवसाय सुरु केल्यानंतर तयार झालेलं प्रोडक्ट व्यवस्थित स्टोर केलं तर ते जास्त काळ टिकू शकतं. तुमची जागा हवेशीर आणि स्वच्छ असायला हवी. कारण हे प्रोडक्ट थेट खाण्यासोबत संबंधित असल्यामुळे यामध्ये रिस्कही तेवढीच आहे.

या व्यवसाय तुम्ही खरंच चांगल्या पद्धतीनं करू शकलात तर महिन्याला 30 ते 40 हजारांचा नफा आरामात मिळणं अगदी सहज शक्य होतं. मात्र त्यासाठी सातत्य, उत्पादनाची क्वालिटी आणि पॅकेजिंग चांगलं असणं आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 08:57 AM IST

ताज्या बातम्या