मुंबई, 27 मे : मोदी सरकारनं नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली. यात काही उद्योगांचा समावेश केला होता. ते सुरू करण्यासाठी सरकार मदत करेल. अनेकदा लोक पैसे नसल्यानं चांगला व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सांगतो बेकरी व्यवसायाबद्दल. त्यात तुम्ही केक, बिस्किट्स, चिप्स आणि ब्रेड बनवण्याचं युनिट सुरू करू शकता.
घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, मोदी सरकारचा नवा प्लॅन
एकूण गुंतवणूक 5.36 लाख रुपये
5.36 लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही बिस्किट तयार करण्याचा व्यवसाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून 90 हजार रुपये काढावे लागतील. बाकी टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटल लोन मिळू शकतं.
100 किलो चिप्स ( 75 रुपये प्रति किलो )
70 किलो मिक्स्चर ( 70 रुपये प्रति किलो )
150 किलो केक ( 300 रुपये प्रति किलो )
15 हजार युनिट पफ्स, कटलेट आणि सुके सामोसे ( 5 रुपये प्रति युनिट )
7500 युनिट इतर गोष्टी ( 5 रुपये प्रति युनिट )
जर तुम्ही 60 टक्के क्षमतेचा वापर केलात तर वर्षाला विक्री 20.38 लाख होईल.
प्राॅडक्शन किंमत - 14.26 लाख रुपये ( यात कच्चा माल, वीज, पगार, टेलिफोन आणि इन्शुरन्स खर्चाचा समावेश आहे)
तुम्हाला हा व्यवसाय सुरू करून 6.12 लाख एकूण नफा होईल.
UPSC : या 5 कारणांमुळे विद्यार्थी IAS परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत
खर्च
टर्म लोनवर व्याज : दर वर्षी 39420 रुपये
वर्किंग भांडवलावरच्या कर्जावर व्याज : दर वर्षी 20860 रुपये
इन्कम टॅक्स : दर वर्षी13000 रुपये
एकूण नफा : दर वर्षी 4.69 लाख रुपये
महिन्याचा नफा : जवळजवळ 40 हजार रुपये
UPSC : या 5 कारणांमुळे विद्यार्थी IAS परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत
जमाखर्चाचा ताळमेळ
प्राॅडक्शन किंमत : 14.26 लाख रुपये
एकूण विक्री : 20.38 लाख रुपये
एकूण नफा : 6.12 लाख रुपये
कर्जाचं व्याज : 50 हजार रुपये
इन्कम टॅक्स: 13-15 हजार रुपये
इतर खर्च: 70-75 हजार रुपये
एकूण खर्च: 4.60 लाख रुपये
महिन्याची मिळकत : 35-40 हजार रुपये
38 टक्के दर वर्षाला रिटर्न मिळतील या हिशेबानं दीड वर्षात गुंतवणूकीचे पैसे वसुल होतील.
पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही कुठल्याही बँकेत अर्ज करू शकता. 5 वर्षांत कर्जाचे पैसे परत करू शकता.