कुठल्याही कम्प्युटरवरून आधार कार्ड डाउनलोड करत असाल तर 'ही' काळजी घ्यायलाच हवी

कुठल्याही कम्प्युटरवरून आधार कार्ड डाउनलोड करत असाल तर 'ही' काळजी घ्यायलाच हवी

तुम्ही कम्प्युटरमधून ई आधार कार्ड डाऊनलोड करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या.

  • Share this:

मुंबई, 05 मे : तुम्ही कम्प्युटरमधून ई आधार कार्ड डाऊनलोड करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या. आधार कार्ड देणाऱ्या अथाॅरिटी युनिक आयडेंटिफिकेशन अथाॅरिटी आॅफ इंडिया ( UIDAI )नं ई आधार कार्ड डाऊनलोड करणाऱ्यांना सावध केलंय. UIDAIनं ट्विट करून सांगितलंय की तुम्ही एखाद्या सार्वजनिक कम्प्युटरवरून आधार कार्ड डाऊनलोड करत असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. आधारला फक्त UIDAIच्या eaadhaar.uidiai.gov.in या आॅफिशियल वेबसाइटवरून डाऊनलोड करा.

तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं खरं की खोटं? अशी टाळा फसवणूक

ही काळजी घ्या - UIDAI ट्विटप्रमाणे तुम्ही सार्वजनिक कम्प्युटरवरून ई आधार डाऊनलोड करत असाल तर ही काळजी घेणं गरजेचं आहे. प्रिंट काढल्यानंतर कम्प्युटरमधली आधारची काॅपी डिलिट करा.

‘राहुल गांधी तुमच्या वडिलांचा कार्यकाळ भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपला’

फाइल कायमस्वरूपी डिलिट करा - तुम्ही कम्प्युटरमधून फाइल डिलिट केली तरी ती रिसायकल बिनमध्ये जाते. ती कायमची डिलिट करायची असेल तर रिसायकल बिनमध्ये जाऊन डिलिट करा. नाही तर रिसायकल बिनमधून पुन्हा फोल्डरमध्ये आणता येते. म्हणूनच ती संपूर्णपणे डिलिट करा.

SPECIAL REPORT: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलींकडून दाढी करून घेतो...

असं डाऊनलोड करा आधारकार्ड

  1. फोनच्या ब्राऊझरनर UIDAI ची https://uidai.gov.in ही वेबसाइट डाऊनलोड करा.
  2. त्यानंतर ‘Download Aadhaar’ वर क्लिक करा किंवा https://eaadhaar.uidai.gov.in/ ही लिंक उघडा.
  3. या वरच्या बाजूला दिलेल्या ‘Enter your personal details’ मध्ये जाऊन  ‘Aadhaar’ या पर्यायाला निवडा.
  4. यात तुम्ही ‘Regular Aadhaar’ वर क्लिक करून त्यात पूर्ण नाव, आधार नंबर, पिन कोड नंबर टाका. जर तुमच्याकडे m-Aadhaar  असेल तर TOTP किंवा OTP जनरेट करा.
  5. आता ‘Request OTP’ वर क्लिक करा.
  6. आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर 6 डिजिट OTP येईल. तो एन्टर करा. ‘Download Aadhaar’  वर क्लिक करून E- Aadhar डाऊनलोड करा.

अन् जंगलाच्या राजाशी कुत्र्यानं घेतला पंगा, VIDEO व्हायरल

First published: May 5, 2019, 11:14 AM IST

ताज्या बातम्या