10वी ते एमडी... BMCमध्ये नोकरीची मोठी संधी

बृहन्मुंबई महानगरपालिकांमध्ये नोकरीची भरती सुरू होणार आहे. एकूण 287 जागांवर भरती होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2019 01:32 PM IST

10वी ते एमडी... BMCमध्ये नोकरीची मोठी संधी

मुंबई, 01 जून : बृहन्मुंबई महानगरपालिकांमध्ये नोकरीची भरती सुरू होणार आहे. एकूण 287 जागांवर भरती होणार आहे. अगदी 10वी उत्तीर्ण ते एमबीबीए,एमडीसाठी या व्हेकन्सीज आहेत.

पुढील जागांसाठी अर्ज मागवलेत

स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र - 33

बालरोग चिकित्सा - 40

अस्थिव्यंग - 18

Loading...

वैदिकशास्त्र - 51

शल्यक्रिया शास्त्र -34

बधिरीकरण- 98

खिसा होणार रिकामा! गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ, 'हे' आहेत मुंबईतले दर

या सगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता एमबीबीएसची पदवी आहे. 1 आॅगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षांमध्ये असावं. मागासवर्गीयांना 5 वर्ष सूट आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2019.

याशिवाय 13 जागांवर भरती केली जाणार आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

कनिष्ठ बालरोग प्रौढ, रक्तदोष कर्करोग तज्ज्ञ-01

विकृती शास्त्रज्ञ  (पूर्ण वेळ)    01

मानद हृदयरोग चिकित्सक    01

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी    01

आहारतज्ज्ञ    01

स्टाफ नर्स     03

वाहन चालक     01

चतुर्थश्रेणी कामगार     04

'स्वरंग'सह विविध रंग उधळणारा मुंबईकरांचा लोकप्रिय 'एलिफंटा महोत्सव' आजपासून

कनिष्ठ बालरोग, कर्करोग तज्ज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद हृदयरोग चिकित्सक या पदांसाठी एमडी/ डीएनबी पर्यंत शिक्षण हवं.

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी एमबीबीएसपर्यंत शिक्षण आवश्यक.

आहारतज्ज्ञ - B.Sc. (Dietetics/Nutrition)

स्टाफ नर्स -  GNM

वाहनचालक - 10वी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना

चतुर्थश्रेणी कामगार - 10वी उत्तीर्ण

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत घेतली उडी

कनिष्ठ बालरोग, कर्करोग तज्ज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद हृदयरोग चिकित्सक, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी वयाची अट 50 वर्षांपर्यंत

आहारतज्ज्ञ, स्टाफ नर्स, वाहनचालक आणि चतुर्थश्रेणी कामगार यांसाठी वयाची अट 38 वर्षापर्यंत आहे.

कनिष्ठ बालरोग, कर्करोग तज्ज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद हृदयरोग चिकित्सक, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदांची अर्ज फी 300 रुपये आहे तर आहारतज्ज्ञ, स्टाफ नर्स, वाहनचालक आणि चतुर्थश्रेणी कामगार यांसाठी अर्ज फी 100 रुपये आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - कॉम्प्रिहेम्प्सिव थॅलेसिमीया केअर, बालरोग रक्तदोष-कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, सीसीआय कम्पाउंड, बोरिवली (पू.) मुंबई – 400066

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे 11 जून 2019


SPECIAL REPORT: वाघांच्या साम्राज्यात...स्मिता गोंदकरसोबत अनोखी जंगल सफारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...