मराठी बातम्या /बातम्या /मनी /Netflix चं सब्सक्रिप्शन होणार स्वस्त! कंपनी कंटेंटमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत

Netflix चं सब्सक्रिप्शन होणार स्वस्त! कंपनी कंटेंटमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत

सध्या नेटफ्लिक्सचा मोबाईल प्लॅन 149 रुपयांचा आहे. हा त्यांचा सर्वांत स्वस्त प्लॅन आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच मोबाईल प्लॅन लाँच केला होता.

सध्या नेटफ्लिक्सचा मोबाईल प्लॅन 149 रुपयांचा आहे. हा त्यांचा सर्वांत स्वस्त प्लॅन आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच मोबाईल प्लॅन लाँच केला होता.

सध्या नेटफ्लिक्सचा मोबाईल प्लॅन 149 रुपयांचा आहे. हा त्यांचा सर्वांत स्वस्त प्लॅन आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच मोबाईल प्लॅन लाँच केला होता.

  मुंबई, 20 एप्रिल: नेटफ्लिक्स (Netflix) ही ओटीटी सेवा पुरवणारी कंपनी आपले युजर्स वाढवण्यासाठी स्वस्त प्लॅन लाँच करण्याच्या विचारात आहे. ज्यात कंटेंटमध्ये जाहिराती दाखवल्या जातात, असा स्वस्त प्लॅन लाँच करण्याच्या तयारीत नेटफ्लिक्स कंपनी असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या अनेक वर्षांपासून नेटफ्लिक्स कोणत्याही जाहिरातीशिवाय चित्रपट आणि टीव्ही शो दाखवत आहे. यासाठी युजर्सना सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं; पण आता कंपनी हा मोठा बदल करणार आहे. कंपनीचे को-चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रीड हेस्टिंग्ज यांनी मंगळवारी जाहिरातींच्या शक्यतेविषयी गुंतवणूकदारांशी संवाद साधला.

  Netflix प्लॅन स्वस्त करण्यामागचं कारण काय?

  नेटफ्लिक्सने कॅलेंडर वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) 2 लाख युजर्स गमावले आहेत. गेल्या एका दशकात पहिल्यांदाच नेटफ्लिक्सचे युजर्स इतक्या मोठ्या संख्येनं कमी झाले आहेत. जूनच्या तिमाहीत कंपनीचं 20 लाख सब्सक्रायबर्सचं नुकसान होऊ शकतं, अशी भीती वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, युजर्सच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने नेटफ्लिक्स आपल्या प्लॅनचे दर कमी करण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत, कंपनी जाहिरातीसह कंटेंट दाखवेल त्यामुळे युजर्सना कमी रकमेत प्लॅन उपलब्ध होतील.

  घटस्फोटानंतर अवघ्या 6 महिन्यात नागा चैतन्य पुन्हा चढणार बोहल्यावर? समंथाची जागा कोण घेणार?

   Netflix चे किती सबस्क्रायबर्स आहेत?

  Netflix चे जगभरात 22 कोटी सबस्क्रायबर्स (Subscribers) आहेत. परंतु, गेल्या काही काळापासून कंपनीच्या सबस्क्रायबर्सची वाढ ठप्प झाली आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 9.8% वाढून 7.87 अब्ज डॉलर्स झाला. पण तरीही वॉलस्ट्रीटच्या अपेक्षेपेक्षा तो कमी आहे. Netflix च्या अंदाजानुसार, 10 कोटी लोक असे आहेत, जे पैसे न देता सेवेचा आनंद घेत आहेत. नातेवाईक किंवा मित्रांचे Netflix सबस्क्रिप्शन वापरणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

  शेअर्समध्ये मोठी घसरण

  मंगळवारी Netflix च्या अमेरिकी बाजारातील शेअर्समध्ये 27% घसरण झाली आहे. कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी असल्याने गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. यामुळे, कंपनीचे शेअर्स 27% घसरून 256 डॉलर्सवर आले.

  Alia Bhatt लग्नानंतर पाचव्या दिवशी कामावर परतली; ट्रेडिशनल लुकमध्ये दिसली 'Mrs. Kapoor'

  नेटफ्लिक्सचे सध्याचे प्लॅन काय आहेत?

  सध्या नेटफ्लिक्सचा मोबाईल प्लॅन 149 रुपयांचा आहे. हा त्यांचा सर्वांत स्वस्त प्लॅन आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच मोबाईल प्लॅन लाँच केला होता. नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन 199 रुपयांपासून सुरू होतो. तर, दुसरीकडे त्यांचा प्रीमियम प्लॅन 649 रुपयांचा आहे.

  सध्याचे मोबाईल प्लॅन

  सध्या नेटफ्लिक्सचा मोबाईल प्लॅन 149 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये व्हिडीओ क्वालिटी चांगली असते. हा प्लॅन फोनसोबतच टॅबलेटवर पाहता येतो.

  बेसिक प्लॅन –

  बेसिक प्लॅन 199 रुपयांपासून सुरू होतो. चांगल्या व्हिडीओ क्वालिटीचा हा प्लॅन मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि टीव्हीवर पाहता येतो.

  स्टॅँडर्ड प्लॅन –

  499 रुपयांचा हा प्लॅन फोन, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि टीव्हीवर पाहता येतो.

  प्रीमिअम प्लॅन –

  प्रीमियम प्लॅन (Premium Plan) 649 रुपयांचा असून याची व्हिडीओ क्वालिटी बेस्ट असते. हा प्लॅन फोन, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि टीव्हीवर पाहता येतो.

  नेटफ्लिक्स खरोखरच प्लॅन्सच्या किमती कमी करतं का आणि प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतात हे काही महिन्यांत स्पष्ट होईल.

  First published:
  top videos

   Tags: Entertainment, Money, Netflix, OTT