पैसे ट्रान्सफर करण्यासाठी उद्यापासून नवीन नियम, जाणून घ्या काय आहे बदल

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी उद्यापासून नवीन नियम, जाणून घ्या काय आहे बदल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार आता तुम्हाला 24 तास NEFTच्या सुविधेचा लाभ सोमवारपासून घेता येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर: आता तुम्ही केव्हाही पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार आता तुम्हाला 24 तास NEFTच्या सुविधेचा लाभ सोमवारपासून घेता येणार आहे. यासंदर्भातील नवा नियम आरबीआयकडून 4 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता. सोमवारी 16 डिसेंबरपासून ह्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आतापर्यंत NEFT सुविधेचा लाभ सकाळी 8 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत घेता येत होता. मात्र नव्या आदेशानुसार तुम्ही 24 तासात कधीही कुठेही आणि कितीही पैसे कोणालाही ऑनलाइन बँकिंगद्वारे ट्रान्सफर करू शकणार आहेत. सध्या IMPS वर काही बँका शुल्क आकारत आहे. NEFT जर जास्त रकमेची असेल तर शुल्क आकारलं जाणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यासंदर्भातील नवीन नियम हा 1 जानेवारी 2020पासून लागू होणार आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच NEFT ची वेळ वाढवून 24x7 करण्यात आली आहे. सध्या NEFT करण्याची वेळ फक्त बँकिंग व्यवहाराच्या तासांपर्यंतच मर्यादित होती. सध्या जर बँक बंद होण्याच्या काही वेळ आधी NEFTकेलं तर ते पैसे दुसऱ्या दिवशी मिळ शकत होते मात्र सोमवारपासून हे पैसे तात्काळ मिळणार आहेत.

वाचा-बँकेतील अर्थिक व्यवहारांसाठी आता आकारलं जाणार अतिरिक्त शुल्क

बचत खात्यांमधून ऑनलाइन व्यवहार करताना NEFT चार्जेस लागणार नाहीत. हा नियम 1 जानेवारी 2020 पर्यंत लागू होईल. याचा अर्थ असा की तुम्ही 1 जानेवारी 2020 पासून NEFT च्या माध्यमातून व्यवहार केलात तर त्यावर हे चार्जेस लागणार नाहीत. ऑनलाइन व्यवहार करताना NEFT आणि RTGS चा वापर केला जातो. या दोन्ही यंत्रणांवर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं.

लोकांना पैशांचे व्यवहार सुरक्षित, सोप्या आणि फायदेशीर पद्धतीने करता यावे यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे. ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या काळात नॉन कॅश रिटेल पेमेंटमध्ये डिजिटल पेमेंटचा वाटा 96 टक्क्यांचा आहे. याच काळात NEFT च्या माध्यमातून 252 कोटी आणि यूपीआय पेमेंट यंत्रणांच्या माध्यमातून 874 कोटींची देवाणघेवाण झाली आहे.

वाचा-बँकेतील अर्थिक व्यवहारांसाठी आता आकारलं जाणार अतिरिक्त शुल्क

विविध बँकांची ATM कार्ड वापरण्याचे नियम बदलणार आहेत. रिझर्व बँकेने गुरुवारी यासंदर्भात सूतोवाच केलं. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी ATM Service Provider नवी नियमावली 31 डिसेंबरला जारी होणार आहे. त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं RBI ने सांगितलं आहे.AT सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात येणार आहेत.

व्यापारी बँका आणि नागरी सहकारी बँकांमध्ये ATM swtich application सेवा पुरवठादाराप्रमाणे बदलतं. त्यासाठीचे नियम नाहीत. ते 31 डिसेंबरला जारी होतील. ते झाल्यानंतर एटीएम वापरण्यासंबंधीचे नियम ग्राहकांसाठीही बदलू शकतात.

Published by: Akshay Shitole
First published: December 15, 2019, 2:17 PM IST
Tags: bank

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading