मुंबई, 7 जून : 1 जूनपासून सर्व वाहन मालकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडत आहे. कारण या महिन्यात वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance) महाग झाला आहे. कार किंवा बाईकच्या इंजिननुसार विम्याचा हप्ता बदलण्यात आला आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने गेल्या महिन्यात एक अधिसूचना जारी केली होती की, 2019-20 मध्ये मोटार विम्याचा प्रीमियम (Insurance Premium) शेवटचा बदल केला होता. थर्ड पार्टी इन्शुरन्स सिंगल प्रीमियम कारसाठी जास्तीत जास्त 3 वर्षे आणि दुचाकीसाठी 5 वर्षांपर्यंत असू शकतो.
थर्ड पार्टी इन्शुरन्सबाबत महत्त्वाच्या गोष्टी
>> नवीन गाडी खरेदी करताना गाडी मालकाने थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास वाहतूक नियमांनुसार दंड आकारला जाऊ शकतो.
>> सरकारने वेगवेगळ्या इंजिन क्षमतेच्या गाड्यांवर वेगवेगळे प्रीमियम निश्चित केले आहेत. जवळपास सर्वच गाड्यांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये वाढ झाली आहे. परंतु 1500 सीसी इंजिन वाहनाच्या प्रीमियममध्ये थोडीशी कपात करण्यात आली आहे.
>> मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 1,000 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 2,072 रुपयांवरून 2,094 रुपये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, 1,000 सीसी ते 1,500 सीसी वाहनांवरील थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम 3,221 रुपयांवरून 3,416 रुपये करण्यात आला आहे. मात्र 1,500 सीसीपेक्षा जास्त वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम किंचित कमी करण्यात आला आहे. तो 7,897 रुपयांवरून 7,890 रुपये करण्यात आला आहे.
Tata ग्रुपच्या 'या' कंपनीमुळे गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, 17 रुपयांचा शेअर 8600 रुपयांवर
>> हा प्रीमियम 1 वर्षासाठी आहे. वाहन मालकाला हवे असल्यास 3 वर्षांसाठी करता येतो, ज्याचे प्रीमियम दर वेगळे असतील.
>> याशिवाय दुचाकींच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्येही बदल करण्यात आले आहेत. आता 150 सीसी ते 350 सीसी पर्यंतच्या बाईकसाठी प्रीमियम 1,366 रुपये असेल, तर 350 सीसी वरील इंजिनसाठी प्रीमियम आता 2,804 रुपये असेल. बाईक मालक 5 वर्षांच्या प्रीमियमची देखील निवड करू शकतात.
>> ई-कार बद्दल बोलायचे झाले तर आता 30 किलोवॅट क्षमतेच्या ई-कारसाठी तीन वर्षांचा प्रीमियम 5,543 रुपये असेल. त्याचप्रमाणे, 30 kW ते 65 kW मधील ई-कारसाठी, तीन वर्षांचा प्रीमियम 9,044 रुपये आकारला जाईल. 65 kW पेक्षा जास्त क्षमतेच्या ई-कारांसाठी आता 20,907 रुपये तीन वर्षांचा प्रीमियम आकारला जाईल.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम असलेले Westin हॉटेल आहे तरी कसं? एका दिवसासाठी साधारण किती खर्च येतो?
थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय
एखाद्या व्यक्तीला वाहनाने धडक दिल्यास, वाहन चालवणारी व्यक्ती हा पहिली पार्टी असते आणि ज्याला धडक दिली जाते ती व्यक्ती थर्ड पार्टी असते. थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत, विमा कंपनी जखमी व्यक्तीला विम्याची रक्कम देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.