दरमहा 5 हजारांच्या गुंतवणूकीवर मिळवा 45 लाख, सोबत मिळणार 22 हजारांची पेन्शन

दरमहा 5 हजारांच्या गुंतवणूकीवर मिळवा 45 लाख, सोबत मिळणार 22 हजारांची पेन्शन

तुम्हाला या एनपीएसचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करावी.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : सेवानिवृत्ती (Retirement)नंतर सगळ्यात मोठी चिंता असते ती बचतीची. परंतु, जर तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System) मध्ये गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर सहजपणे तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये भारतातील कोणताही नागरिक 18 ते 65 वर्षे वयोगटातील गुंतवणूक करू शकतो. एनपीएस अंतर्गत जमा केलेला निधी तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर आणि गुंतवणूकीची मुदत किती यावर अवलंबून असते. एनपीएसमधील गुंतवणूक पीएफआरडीएच्या मंजूर पेन्शन फंडद्वारे व्यवस्थापित केली जाते. पीएफआरडीए गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित हे सेट केले गेले आहे.

तुम्हाला या एनपीएसचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करावी. आपण ऑनलाइन एनपीएस कॅल्क्युलेटरच्या मदतीने गुंतवणूकीची रक्कम आणि अंदाजित परताव्याची गणना करू शकता.

असे कमवा 45.5 लाख रुपये

एनपीएस कॅल्क्युलेटरनुसार तुम्ही वयाच्या 30व्या वर्षापासून दरमहा 5 हजार रुपये गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 22, 279 रुपये आणि सुमारे 45.5 लाख रुपये पेन्शन मिळू शकतं. तर तुम्हाला हवं असल्यास ही मासिक गुंतवणूक वाढवू देखील शकता.

इतर बातम्या - मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात बिअर बारला उत, तब्बल 26 जणांवर धडक कारवाई

10 हजारांच्या गुंतवणूकीवर करू शकता जास्त बचत

एनपीएस अंतर्गत तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षापासून दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर निवृत्ती होईपर्यंत तुम्हाला दरमहा  45,587 रुपये आणि 91.1 लाख रुपये पेन्शन मिळू शकतं. बरं इतकंच नाही तर वार्षिक 10% व्याज दराने ही रक्कम देण्यात येते.

इतर बातम्या - PMC नंतर आणखी एका बँकेत कोटींचा घोटाळा, 1 लाख खातेदार पैसे काढू शकणार नाहीत!

करामध्ये मिळेल लाभ

नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये केलेल्या गुंतवणूकीवरील आयकर कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या सूट व्यतिरिक्त तुम्हाला 50,000 रुपयांची कर सूट मिळू शकते. एनपीएसमध्ये टियर 1 आणि टियर 2 अशी दोन प्रकारची खाती उघडली जाऊ शकतात. टियर 1 खाते अनिवार्य आहे तर टियर 2 खाती पर्यायी आहेत. टियर 1 खात्यावर पैसे काढणं बंदी आहे. त्याचवेळी, ग्राहक टियर 2 खात्यातून कधीही गुंतवणूकीची रक्कम काढू शकतो.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 13, 2019, 12:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading