Home /News /money /

दररोज 14 रुपये भरा आणि वर्षाला 10.20 लाखांचं पेंन्शन घ्या; मोदी सरकारची योजना

दररोज 14 रुपये भरा आणि वर्षाला 10.20 लाखांचं पेंन्शन घ्या; मोदी सरकारची योजना

सध्या या योजनेत 18 ते 40 वयोगटातल्यांना फायदा होतो. या योजनेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्यांचं वय वाढविण्याचा विचारही सरकार करतेय.

  मुंबई 03 जानेवारी : नवीन वर्षात नरेंद्र मोदी सरकार एक महत्त्वाची योजना आणण्याची शक्यता आहे. Atal Pension Yojnaनेत सरकार मोठी सुधारणा करून सरकार ही योजना नव्याने आणू शकते. या योजनेत सध्या महिन्याला 5 हजार रुपये पेंन्शन निवृत्तीनंतर मिळू शकतं. ती रक्कम दुप्पट करण्याचा सरकारचा विचार असून आता 10 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचे काही प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे आले असून त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.सध्या या योजनेत 18 ते 40 वयोगटातल्यांना फायदा होतो. या योजनेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्यांचं वय वाढविण्याचा विचारही सरकार करतेय. सध्याच्या नियमांनुसार 18 वर्षांचा नागरीक या योजनेत पैसे भरू शकतो. 18 वर्षांसाठीच्या लोकांची पेंन्शनची मर्यादा 5 हजार रुपये आहे. त्यासाठी त्यांना महिन्याला 210 रुपये भरावे लागतात. ही मर्यादा 10 हजार झाली तर त्याच व्यक्तिला महिन्याला 420 रुपये भरावे लागतील. म्हणजे त्याला दररोज 14 रुपये भरावे लागणार लागतील. असं त्याने 60 वर्षांपर्यंत केलं तर त्याला महिन्याला 10 हजार किंवा वर्षाला 1.20 लाख रुपये मिळतील. अमेरिकेचा हवाई हल्ला, थेट तुमच्या खिशावर होणार हे 6 परिणाम अमेरिका आणि इराणमधल्या वाढत्या तणावामुळे रुपया चांगलाच घसरलाय. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत 71.80 वर गेलीय. याचा अर्थ एका डॉलरसाठी आपल्याला 71 रुपये 80 पैसे मोजावे लागतील. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातले पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवायला सुरुवात केलीय. त्यामुळे रुपया कमजोर झालाय. यामुळे आता आयात महागलीय. पेट्रोल - डिझेलसह सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

  नव्या वर्षात SBI ची नवी सेवा! कार्ड नसेल तरी करता येणार पेमेंट

  नवीन वर्षात तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असेल तर आता चांगले पर्याय आहेत. विमा कंपन्या अनेक प्रकारच्या योजना ऑफर करतात. त्यामुळे सामान्य माणसाचा गोंधळ उडतो. म्हणूनच विमा नियंत्रक यंत्रणा म्हणजेच (IRDAI) ने सगळ्या विमा कंपन्यांना एक लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा स्टँडर्ड इंडिव्हिज्य़ुअल हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  पुढील बातम्या