कचरा करणाऱ्यांना द्यावा लागणार जास्त टॅक्स, मोदी सरकारचा आहे 'हा' प्लॅन

कचरा करणाऱ्यांना द्यावा लागणार जास्त टॅक्स, मोदी सरकारचा आहे 'हा' प्लॅन

Modi Government, Tax - मोदी सरकारनं पर्यावरणाला पूरक अशी पावलं उचललीयत

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : कचरा प्रदूषण वाढवतो. म्हणूनच सरकार रिसायकल्ड सामानांचा वापर करणाऱ्या कंपन्यांना कर सवलत देण्याच्या तयारीत आहे. तर कचरा पसरवणाऱ्या कंपनीला सरकार जास्त कर लावणार आहे. नव्या खाणींनाही सरकार कर लावणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पर्यावरण मंत्रालयानं यावर रोडमॅप तयार केलाय.जास्त कचरा पसरवणाऱ्या कंपनींवर लँडफिल टॅक्स लावण्याचा प्रस्ताव आहे.

संसाधनांचा योग्य उपयोग करण्यासाठी नॅशनल रिसोर्स अथोरिटी तयार केली जाईल. ती संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी नियम बनवेल आणि ते पाळले जातात की नाही ते पाहील. पर्यावरण मंत्रालयानं 2019-22साठी रोडमॅप बनवलाय.

मोदी सरकारची मोठी गिफ्ट, आता कार आणि बाइक होणार 'इतके' स्वस्त

सरकार पर्यावरणासाठी सतर्क आहे. त्यासाठी सरकारनं इलेक्ट्रिक कार्सना प्राधान्य द्यायचं ठरवलंय.

GST काउन्सिलची बैठक संपली. त्या बैठकीत सर्वसामान्यांना एक भेट मिळाली आहे. काउन्सिलनं बॅटरीवर चालणाऱ्या कार आणि स्कुटरवर लावण्यात येणाऱ्या GSTमध्ये कपात केलीय. त्यामुळे 1 ऑगस्टपासून इलेक्ट्रिक व्हेइकलवर जीएसटीचे दर 12 टक्क्यांहून कमी होऊन 5 टक्के झालेत. या निर्णयामुळे कार खरेदी करणं 70 हजार रुपयापर्यंत स्वस्त झालंय.

फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, पगार महिन्याला दीड लाख

कार खरेदी होणं होईल स्वस्त - 1 ऑगस्टनंतर इलेक्ट्राॅनिक कारवरचा जीएसटी कमी झालाय. तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत इलेक्ट्रिक कार खरेदी करत असाल, तर 1 ऑगस्टनंतर तुमचे 70 हजार रुपये वाचतील. समजा तुम्ही 1 लाख रुपयांची इलेक्ट्रिक बाइक खरेदी करत असाल तर 7 हजार रुपये कमी खर्च येईल.

काय झाला निर्णय?

GST काउन्सिलच्या बैठकीत इलेक्ट्रिक व्हेइकलवर टॅक्सचे दर 12 टक्के कमी होऊन 5 टक्के झालेत. चार्जरवर जीएसटी दर 18 टक्के कमी होऊन 12 टक्के झालाय. नवे दर 1 ऑगस्टपासून लागू होतील.

90 दिवसाचं मूल ते 65 वर्षाच्या व्यक्तीसाठी आहे 'ही' LIC पाॅलिसी

याशिवाय 12 प्रवाशांच्या इलेक्ट्रिक बसच्या खरेदीवर जीएसटी देण्याचा निर्णय झालाय.

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: July 27, 2019, 6:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading