बाजारात लवकरच 30 रुपये किलोने विकला जाईल कांदा; सरकारने सांगितला प्लान

बाजारात लवकरच 30 रुपये किलोने विकला जाईल कांदा; सरकारने सांगितला प्लान

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यांकडून सर्व खर्च जोडून, बाजारात जास्तीत-जास्त 30 रुपये किलोने कांदा विकला जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : देशातील विविध भागात कांद्यांच्या किंमती वाढत असताना, NAFED ने खास योजना तयार केली आहे. बाजारात स्वस्त दरात कांद्यांची विक्री होण्यासाठी NAFED कडून प्लान तयार केला जात आहे. येत्या 10 दिवसात राजस्थानमधून कांदा येण्याची शक्यता असल्याने, कांद्याचा भाव उतरणार असल्याचं, नाफेडच्या संचालकांनी सांगितलं.

दुसरीकडे NAFED आपल्या गोदामांतून कांदा दुसऱ्या राज्यांत पाठवत आहे. कांद्याचं पीक पावसामुळे खराब झाल्याने, किमतीवर मोठा परिणाम झाल्याचं NAFED संचालकांनी म्हटलं आहे.

(वाचा - दिवाळीनंतर काजू-बदामच्या किंमती कमी होण्याची शक्यता; हे आहे कारण)

NAFED चे संचालक अशोक ठाकूर यांनी न्यूज 18शी बोलताना सांगितलं की, लवकरच राज्यांना 21 रुपये प्रति किलोने कांदा पाठवला जाणार आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट आणि इतर खर्च जोडून राज्यांकडून आपल्या हिशोबाने तो कांदा बाजारात विक्रीसाठी ठेवला जाईल. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यांकडून सर्व खर्च जोडून, बाजारात जास्तीत-जास्त 30 रुपये किलोने कांदा विकला जाण्याची शक्यता आहे.

NAFED कडे केवळ 25 हजार टन कांदा -

केंद्र सरकारकडे बफर स्टॉकमध्ये (Onion Buffer Stock) आता केवळ 25 हजार टन कांदा आहे. जो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपेल, अशी माहिती NAFED चे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चड्ढा यांनी शुक्रवारी दिली. सध्या देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि कांद्याचे दर कमी करण्यासाठी नाफेड कांद्याचा बफर स्टॉक उतरवत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमती 75 ते 100 रुपये किलोपर्यंत पोहचल्या आहेत.

(वाचा - कांद्याच्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्राचा प्लॅन; एवढाच कांदा साठवता येणार)

कांद्याच्या बफर स्टॉकला नाफेड केंद्र सरकारकडून तयार आणि व्यवस्थापित करतो, जेणेकरून गरज पडल्यास याचा वापर केला जाऊ शकेल. यावर्षी नाफेडने बफर स्टॉकसाठी 1 लाख टन कांद्याची खरेदी केली होती. आता कांद्याच्या वाढत्या किमतीवर लगाम लावण्यासाठी याचा वापर केला जात आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 24, 2020, 6:20 PM IST
Tags: onion

ताज्या बातम्या