मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रोज 2 रुपये गुंतवा आणि 36 हजारांची पेन्शन मिळवा; 'या' सरकारी योजनेतून वृद्धापकाळ सुरक्षित करा

रोज 2 रुपये गुंतवा आणि 36 हजारांची पेन्शन मिळवा; 'या' सरकारी योजनेतून वृद्धापकाळ सुरक्षित करा

Pradhan Mantri Shramayogi Mandhan Yojana ही योजना मजूर, चालक, घरकाम करणारे, मोची, शिंपी, रिक्षाचालक इत्यादी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सद्यस्थितीत देशातील असंघटित क्षेत्रात सुमारे 42 कोटी लोक काम करतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 नोव्हेंबर : वृद्धापकाळात पैसा आणि इतर गरजा भागवण्यासाठी इतरत्र भटकायचे नसेल, तर निवृत्तीचे नियोजन (Retirement planning) करणे अत्यंत गरजेचे आहे. निवृत्तीनंतर आर्थिक त्रास टाळण्यासाठी आज गुंतवणुकीचे अनेक पर्याय (Investment Options) उपलब्ध आहेत. यामध्ये खाजगी आणि सरकारी पातळीवर गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जेणे करून तुम्हाला वृद्धापकाळात पुरेसे पैसे उपलब्ध होऊ शकतील. यापैकी एका योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PMSMY). या सरकारी योजनेत, तुम्ही दररोज 1.80 रुपये गुंतवून वृद्धापकाळात दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळवू शकता. केंद्र सरकारची ही योजना (Government Scheme) कमी उत्पन्नावर राहणाऱ्या लोकांसाठी आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही योजना मजूर, चालक, घरकाम करणारे, मोची, शिंपी, रिक्षाचालक इत्यादी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सद्यस्थितीत देशातील असंघटित क्षेत्रात सुमारे 42 कोटी लोक काम करतात. कुणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही? प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही सरकारी योजना असल्याने त्यावर हमखास परतावा मिळेल. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) किंवा राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) किंवा राज्य कर्मचारी विमा आयोग (ESIC) चे सदस्य किंवा आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. वर्षभरात 'हा' शेअर 16 टक्के वाढणार, MOTILAL OSWAL चा अंदाज; तुमच्याकडे आहे का? योजनेनुसार, जर एखादी व्यक्ती दरमहा 15,000 रुपयांपेक्षा कमी कमावत असेल आणि त्याचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असेल, तर 60 वर्षांनंतर त्याला दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळू शकते. मोदी सरकारने 2019 मध्ये ही योजना सुरू केली होती. केंद्र सरकारचे उद्दिष्ट पुढील 5 वर्षात या योजनेत सुमारे 10 कोटी लोकांची नोंदणी करण्याचे आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत व्यक्ती त्यांच्या वयानुसार गुंतवणूक करू शकतात. जर तो 18 वर्षांचा असेल तर त्याला दरमहा 55 रुपये गुंतवावे लागतील. 19 वर्षे वयोगटातील लोकांना दरमहा 100 रुपये आणि 40 वर्षे वयाच्या लोकांना दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतील. निवृत्ती वेतन सेवा सुरू होण्यापूर्वी लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्याच्या/तिच्या जोडीदाराला पेन्शनच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम मिळेल, अशी व्यवस्थाही सरकारने केली आहे. फक्त 53 हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा 35 लाख रुपये! पेन्शनसाठी आवश्यक कागदपत्रे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने तीन कागदपत्रांची आवश्यकता असेल. या कागदपत्रांसाठी आधार कार्ड, IFSC कोडसह बचत बँक खाते क्रमांक किंवा जन धन खाते आणि वैध मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. योजनेत सामील होण्यासाठी, एखाद्याला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जावे लागेल. EPFO च्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर शोधू शकता. यासोबतच भारतीय आयुर्विमा महामंडळ, राज्य विमा महामंडळ आयोग, केंद्र किंवा राज्याच्या कामगार कार्यालयाला भेट देऊनही हे काम करता येईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Investment, Pension scheme

    पुढील बातम्या