म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 'या' गोष्टींची काळजी घ्याच, नाहीतर होईल नुकसान

हल्ली सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंडात SIPमार्फत गुंतवणूक केली जाते. त्यातले धोके कसे ओळखायचे ते वाचा

  • Share this:

हल्ली बरेच जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतात. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये ही गुंतवणूक सुरू असते. त्यालाच सिप म्हणतात.

पण सध्या मिड आणि स्माॅल कॅप फंडमध्ये ज्यांनी पैसे गुंतवलेत त्यांचं नुकसान झालंय. हे नुकसान 6 टक्के झालंय. अनेकदा SIPमध्ये तुमच्या अकाऊंटमधून दर महिन्याला पैसे जात असतात. पण नुकसान होतंय हे गुंतवणूकदाराच्या लक्षातही येत नाही. म्हणूनच पुढील काळजी घेणं आवश्यक आहे.

वेळोवेळी फंड्समधून पैसे काढत राहा. एखाद्या फंडात तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर पाय वर्षांनी ही रक्कम 1.20 लाख होऊ शकते. स्टाॅक मार्केट पडलं तर नुकसान होतं. म्हणून नेहमी व्ह्यॅल्यू कळली की पैसे काढून घ्यावेत.

तज्ज्ञांच्या मते लाँग टर्मचा अर्थ असा नाही की निगेटिव्ह फंडातच चिकटून राहायचं. फंड बदलत राहावेत.

अण्डरपरफाॅर्मर फंड ओळखायला शिकलं पाहिजे. अनेकदा निगेटिव्ह फंडात पैसे तसेच ठेवले तर नुकसान होतं. एखादा फंड नुकसानीत आहे कळल्यावर सरळ तो बंद करावा.

चांगले फंड्स निवडा. उगाच एजंट सांगतोय म्हणून निवडू नका. त्यासाठी मार्केटवर लक्ष ठेवा.

म्युच्युअल फंड निवडताना चार गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. परफॉर्मेंस, रिस्‍क, मॅनेजमेंट आणि कॉस्‍ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 11:49 AM IST

ताज्या बातम्या