5 हजार रुपये गुंतवून कमवा 49 लाख, 'अशी' करा सुरुवात

5 हजार रुपये गुंतवून कमवा 49 लाख, 'अशी' करा सुरुवात

तुम्ही नोकरी करतानाच योग्य प्लॅनिंग केलं तर सहज लाखो रुपये जमा करू शकता.

  • Share this:

मुंबई, 08 मे : श्रीमंत होण्याचं स्वप्न तर सगळेच बघतात. पण ते पूर्ण होण्याची हिंमत खूप कमी जणांकडे असते. तुम्ही नोकरी करतानाच योग्य प्लॅनिंग केलं तर सहज लाखो रुपये जमा करू शकता. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, कुठे पैसे गुंतवायचे? तज्ज्ञांच्या मते सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक नियोजन योग्य दिशेनं करणं जरुरी आहे. तुम्ही दर महिन्याला योग्य गुंतवणूक केली तर त्याचा फायदा नक्की होईल. कॅपिटल मार्केटमध्ये अनेक पर्याय आहेत.  त्यातलाच एक चांगला पर्याय म्हणजे एसआयपी (SIP ) करून  म्युच्युअल फंडात गुंतवणूक. जाणून घेऊ त्याबद्दल-

रिक्षा ड्रायव्हरनं खरेदी केला 1.6 कोटींचा बंगला, सत्य तपासताना आयकर अधिकाऱ्यांच्या आले नाकीनऊ

म्युच्युअल फंडाच्या SIP मध्येच का गुंतवायचे पैसे?

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार गेली 15 वर्ष सोन्यापेक्षा  शेअर मार्केटमध्ये रिटर्न मिळालेत. पण शेअर बाजारात चढउतार सुरू असतात. म्हणून आर्थिक सल्लागार नेहमी म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. सध्या इक्विटी म्युच्युअल फंडानं गेली 15 ते 20 वर्षात 20 टक्के रिटर्न दिलेत. जे गुंतवणूकदार थोडा धोका पत्करू पाहतात, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. पाच वर्ष गुंतवणूक ठेवलीत तर बाजारातला धोकाही कव्हर होतो.

चिनी नवरा आणि पाकिस्तानी नवरी, चीनमधले तरुण पाकिस्तानमध्ये येऊन का करतात लग्न?

कसे मिळणार 49 लाख रुपये?

एसकोर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल म्हणतात, चांगल्या इक्विटी फंडात दर महिन्याला 15 हजार रुपये गुंतवा. रोजच्या खर्चातले 170 रुपये गुंतवणुकीसाठी वाचवलेत तर हे अवघड नाही. ही गुंतवणूक 20 वर्ष करावी लागेल. वर्षाला 12 टक्के रिटर्न मिळाले की ही गुंतवणूक 49 लाख रुपये होईल.


यात पैसे गुंतवणं सुरक्षित आहे?

आसिफ इकबाल म्हणाले, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करून मोठा फंड तयार करू शकता. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत धोका कमी असतो.

महाराष्ट्रात कशी असणार पावसाची स्थिती? भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर

तुम्ही सगळे पैसे एकाच कंपनीत गुंतवलेत आणि ती कंपनी बुडली तर मोठं नुकसान होईल. पण तुम्ही वेगवेगळ्या कंपनींमध्ये पैसे गुंतवलेत तर जास्त फायदा होतो. म्युच्युअल फंडांची हीच तर खासीयत आहे.

तुमचे पैसे वेगवेगळ्या शेअर्स आणि बाॅण्डसमध्ये गुंतवले जातात. एखादी कंपनी बुडाली तरी दुसऱ्या कंपनींकडून होणाऱ्या फायद्यानं नुकसान होत नाही.


वायुसेनेचं विमान घसरलं, विमानतळावरून EXCLUSIVE रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 01:03 PM IST

ताज्या बातम्या